Aanchal Tiwari: अभिनेत्री आंचल तिवारीचा दुर्दैवी मृत्यू; अपघातात नऊ जणांनी गमावला जीव

बिहारमधील अपघातात अभिनेत्री आंचल तिवारीचा (Aanchal Tiwari) मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात भोजपुरी इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा मृत्यू झाला आहे.
accident
accidentaccident
Updated on

Aanchal Tiwari: बिहारमधील (Bihar) कैमूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेत्री आंचल तिवारीचा (Aanchal Tiwari) मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात भोजपुरी इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा मृत्यू झाला आहे. या कलाकारांच्या मृत्यूनंतर भोजपूरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये भोजपूरी कलाकारांचा समावेश आहे. गायक छोटू पांडे, भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव यांनाही या रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे.

दोन महिलांसह आठ लोक एका एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी या गाडीला एका दुचाकीला धडकली. यानंतर,एसयूव्ही आणि दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.या घटनेनंतर NH 2 वर ट्रॅफिक जाम झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भभुवा येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.

आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव,छोटू पांडे, प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशि पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

accident
Pankaj Udhas Death: कोणत्या आजारानं झाला गझल सम्राट पंकज उधास यांचा मृत्यू? अनुप जलोटांनी केला खुलासा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.