Panchayat Season 3 First Look: सचिव - प्रधान पुन्हा भेटीला! 'पंचायत 3' चा फर्स्ट लूक रिलीज! कधी येतेय भेटीला?

निर्मात्यांनी पंचायत सीझन 3 चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
Panchayat Season 3 First Look
Panchayat Season 3 First LookEsakal

Panchayat Season 3 First Look: सध्या थिएटर पेक्षा प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवरील बेवसिरिज पाहण्यात जास्त रस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना बऱ्याच वेब सिरिजच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.

ज्यात मिर्झापुर सारख्या सिरिजची प्रेक्षकांना उत्सुकता होतीच. त्यातच आणखी एक वेब सिरिज ज्याची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओ वरील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज पंचायत 3.

या सिरिजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांच्या या सुपरहिट वेब सीरिज बाबत एक अपडेट समोर आले आहे.

Panchayat Season 3 First Look
Bigg Boss 17: लोकांनी दाखवला बाहेरचा रस्ता! सना खानचा बिग बॉसमधला प्रवास संपला

पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर आता निर्माते या सिरिजचा तिसरा भाग म्हणजेच पंचायत 3 प्रेक्षकांच्या भेटीलाय घेऊन येत आहेत. आता या सिरिजचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यात जितेंद्र कुमार दिसत आहे.

रिलिज झालेल्या या पहिल्या लूकमध्ये सचिव म्हणजेच जितेंद्र कुमार बाईकवर बसलेला दिसत आहेत. तो दुचाकी चालवत असून त्याच्या मागे ट्रॉली बॅग आहे.

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये पंचायत 2 मधील भूषण म्हणजेच बनराकस, विनोद आणि माधव हे एकत्र दिसत आहेत. हे एका बाकावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे एक कोट लिहिला आहे, 'जेव्हा तुम्ही अडखळता, दुखावले जातात, तेव्हाच एखादी व्यक्ती काहीतरी शिकू शकते.'

तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आम्हाला चांगले माहित आहे की प्रतीक्षा करणे खूप असह्य आहे. याच कारणासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास घेऊन आलो आहोत.

Panchayat Season 3 First Look
Milind Gawali: "पोलिसात असताना खंडेलवाल कंपनीची एक केस...", मिलिंद गवळींनी सांगितला बाबांचा खास किस्सा

त्यामुळे आता लवकरच पंचायत सीझन 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहते खुप खुश आहेत.

पंचायत या वेब सिरीज बद्दल बोलायचे झाले तर या सिरिजचा पहिला भाग 2020 मध्ये रिलीज झाला होता. तर दूसरा भाग 2022 मध्ये रिलिज झाला जो खुपच सुपरहिट ठरला. आता पंचायत सीझन 3 पुढील वर्षी 2024 मध्ये Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com