शिवकुमार शर्मा यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी भावूक, 'यापुढे...'

संतुरवादनाला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणारे संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत आज निधन झाले.
Pandit Shivkumar Sharma Passed Away
Pandit Shivkumar Sharma Passed Away esakal
Updated on

Shivkumar Sharma: संतुरवादनाला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणारे संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या (Bollywood News) निधनाचे वृत्त कळताच भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यावर आता देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी (Indian Music) आदरांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देखील शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. जगभरात संतुरवादनानं श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचा चाहतावर्ग मोठा होता. अतिशय संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी वाट काढत आपली स्वताची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वाला मोठा हादरा बसला असून त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवकुमार शर्मा हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर एका रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र त्यादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरव्दारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आज आपल्या देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. आपण पंडित शिवकुमार शर्मा यांना गमावले आहे. त्यांच्या जाण्यानं तीव्र वेदना झाल्या आहेत. संतुरवादनानं ते जगभर ओळखले गेले. त्यांना त्या वाद्यानं वेगळी ओळख निर्माण करुन दिली. भारतीय संगीत विश्वात भरीव कामगिरी करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती, त्यांच्या संगीतरचना या नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहेत. त्यांचे कर्तृत्व कधीही विसरता येणार नाही. मी त्यांच्या कुटूंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करतो आहे. ओम शांती. अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

Pandit Shivkumar Sharma Passed Away
ShivKumar Sharma: 'पायावर डोकं ठेवावं असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्टिट करताना म्हटले आहे की, पद्म विभुषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला आहे. त्यांचे जाणे दु:खदायक आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते शिवकुमार शर्मा यांच्यासोबत माझे घनिष्ठ संबंध होते. संगीतविषयक अनेक गोष्टींवर चर्चा होत असे. आपल्या संतुरवादनानं एक वेगळा विचार त्यांनी श्रोत्यांना दिला. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील संतुरवादनानं त्यांनी श्रोत्य़ांना जिंकुन घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.