छोट्या पडद्यावरची(Tv Serial) प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन बुद्दरूप(SImran Bhudharup) तिच्या 'पंड्या स्टोर' मालिकेतील ऋषिता या व्यक्तिरेखेमुळे नेहमीच चर्चेत असते. 'पंड्या स्टोर'(Pandya Store) हा एक प्रसिद्ध फॅमिली ड्रामा आहे. सिमरननं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. सिमरनला सोशल मीडियावर(Social Media) काही तरुण मुलांनी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं यातून समोर आलं आहे. (Pandya Store fame Simran Budharup reveals she would get rape threats on social media)
अभिनेत्रीनं सांगितलं आहे की सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण नंतर-नंतर त्या धमक्यांचं विकृत स्वरुप होत गेलं आणि मग मला पोलिसांत तक्रार करणं भाग पडलं. सोशल मीडियावर ट्रोलिंगविषयी बोलताना सिमरनं म्हणाली की,''सुरुवातीला ती नकारात्म प्रतिक्रियांकडे फारसं लक्ष द्यायची नाही,कारण मालिकेतील माझी भूमिका ज्या प्रकारची आहे मला लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स अपेक्षित होत्या''.
सिमरन पुढे म्हणाली की,''माझ्या व्यक्तिरेखेनं 'पंड्या स्टोर' मालिकेतील रावी आणि देव मधलं नातं तोडलं होतं. पण यामुळे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मला खूप भयानक गोष्टींचा सामना करावा लागला. खूप गलिच्छ भाषेचा वापर करुन माझ्याबद्दल बोलणं,मला बलात्कार करुन मारुन टाकू अशा धमक्या मिळू लागल्या. खूप चिंताजनक गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. मग मात्र मी पोलिसांत याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तपासात कळलं की हा एक १३ ते १४ वर्षांच्या मुलांचा ग्रुप होता. आई-वडील मुलांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून फोन घेऊन देतात पण मुलं मात्र त्याचा गैरवापर करतात. त्यांना योग्य-अयोग्य कळत नाही आणि मग ते अशा चुका करून बसतात''.
सिमरन पुढे म्हणाली,''मला वाटतं की पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं. कारण या वयात त्यांना चांगलं-वाईट कळत नाही. माझ्या बद्द्लच्या त्या अतिशय घाणेरड्या कमेंट्स वाचून मला जेव्हा कळलं की त्या या मुलांनी लिहील्या आहेत तेव्हा मला फार वाईट वाटलं. मी माझ्या आयुष्यात खुश आहे,काम करतेय पण मला त्या लहान मुलांचे राहून-राहून वाईट वाटत आहे. मला देखील एक लहान बहिण आहे जी त्यांच्या वयाची आहे पण तिने जर असं काही केलं तर मी तिच्यासोबत काय करेन याचा मी विचारही करु शकत नाही''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.