Ravi Jadhav: रवी जाधव, पंकज त्रिपाठी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला, कारण..

एका खास विषयावर चर्चा करण्यासाठी अभिनेते पंकज त्रिपाठी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
Pankaj Tripathi and ravi jadhav meets Yogi Adityanath as he films Main Atal Hoon in Lucknow
Pankaj Tripathi and ravi jadhav meets Yogi Adityanath as he films Main Atal Hoon in Lucknowsakal
Updated on

Main Atal Hoon: अभिनेते पंकज त्रिपाठी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान एका खास विषयावर चर्चा करण्यात आली. या संदर्भात एक पोस्ट रवी जाधव यांनी शेयर केली आहे.

ही भेट अत्यंत खास होती. कारण या भेटी दरम्यान रवी जाधव, पंकज त्रिपाठी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी 'अटल बिहारी वाजपेयी' याच्या जीवनावर चर्चा केली. योगी आदित्यनाथ यांनी अनुभवलेले अटलजी, त्यांचं नेतृत्व, किस्से आणि योगीजींचा अनुभव यावर दिलखुलास गप्पा झाल्या.

(Pankaj Tripathi and ravi jadhav meets Yogi Adityanath as he films Main Atal Hoon in Lucknow)

Pankaj Tripathi and ravi jadhav meets Yogi Adityanath as he films Main Atal Hoon in Lucknow
Sonam Kapoor Birthday: आतापेक्षाही लहानपणी शंभरपट गोड दिसायची सोनम कपूर.. पहा हे खास फोटो..

भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी नेतृत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी ज्यांची ख्याती आहे. अशा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे.

मराठी दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे नाव जाहीर झाले त्यानंतर अटलजींच्या जयंती निमित्त या चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपातील फर्स्ट लुक समोर आला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

याच निमित्ताने अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी ही खास भेट घेण्यात आली. त्या नंतर रवी जाधव यांनी एक पोस्ट शेयर केली आहे.

Pankaj Tripathi and ravi jadhav meets Yogi Adityanath as he films Main Atal Hoon in Lucknow
Ameesha Patel Birthday: माझा बाप भ्रष्टाचारी आहे.. म्हणत, अमीषानं बापाशीच घेतलं होतं वैर.. काय आहे प्रकरण?

यामध्ये रवी जाधव यांनी लिहिले आहे की, 'योगी आदित्यनाथ यांना भेटणं हा अत्यंत सुखद अनुभव होता. त्यांच्याकडून अटलजींचे विचार ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आणि चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा ही मिळाली.' अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. तर पंकज त्रिपाठी यांनीही यासंदर्भात पोस्ट शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.