Pankaj Udhas Career and Facts: प्रसिद्ध गझल सम्राट पंकज उधास यांच्या निधनानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या बहारदार गायकीनं नेहमीच चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या पंकजजींच्या काही मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आता एका मुलाखतीमधून पंकज उधास यांनी आपल्याला आयुष्यभर ज्या गोष्टीची खंत मनात राहिली त्या विषयी सांगितलं आहे. द कपिल शर्मा शो मध्ये ते आले होते. यावेळी त्यांनी त्यांचं सांगितिक प्रवास आणि संघर्ष या बद्दल सांगितलं आहे.
पंकजींनी लता मंगेशकर यांच्या सोबत झालेल्या पहिल्या मुलाखतीविषयी सांगितले. त्यांनी म्हटले होते की, मी लता दीदींसोबत तीन गाणी गायली होती. मात्र माझं दुर्देव असं की, मला त्यांना भेटला आले नाही. जेव्हा मी स्टुडिओमध्ये जायचो तेव्हा ते त्यांचं गाणं गाऊन जात असे. मी नेहमीच दीदींना भेटण्यासाठी प्रयत्न करायचो. गणेश पूजनच्या दिवशी त्यांच्या घरी जायचो. अशीही आठवण पंकज यांनी यावेळी सांगितली.
मला माहिती होतं की, भलेही मी ज्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत ते चित्रपट फ्लॉप झाले असतील पण माझी गाणी लोकांना आवडत होती. हे माझ्यासाठी खूपच आनंददायी होतं. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारे नकारात्मक विचार करत नव्हतो. मी पुढे काही दिवसांनी उर्दू भाषा शिकलो. १९८० मध्ये आलेल्या आहट नावाच्या चित्रपटानंतर पंकज उधास यांना मोठ्या प्रमाणात यश मिळण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते.
द कपिल शर्मा शो मध्ये पंकज उधास आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये घडलेला प्रसंग सांगितला होता. ते म्हणाले, मला एकानं बंदूकीचा धाक दाखवून गाणं गायला लावलं होतं. एकानं माझ्या कानावर बंदूक ठेवली आणि गाणं म्हणायला सांगितले. माझ्यासाठी ते खूपच धक्कादायक होतं. तो प्रकार पाहून मी घाबरुन गेलो होतो.
मला प्रश्न पडला होता की, कुणी अशाप्रकारे धमकी देऊन जर मला गाणं म्हणायला लावत असेल तर मी का गाणं म्हणू? ते कोण मला सांगणारे, मी काय त्यांचा गुलाम आहे का, ते माझ्यावर अशाप्रकारे बळजबरी करु शकत नाहीत. मी त्या व्यक्तीला म्हटलो की, थोड्या वेळानं गातो म्हणून...त्यानंतर तो परत आला आणि म्हणाला साहेब चिडले आहेत. तुम्ही ते गाणं म्हणा...
साहेब चिडले म्हणून त्यानं माझ्यावर आगपाखड करत बंदूकीचा धाक दाखवून गाणं म्हणायला लावलं होतं. माझ्यासाठी हे सारं नवीन होतं. या घटनेनं मला खूप मोठा धडा दिला होता. त्यानंतर मी मला काय गायचं हे न ठरवता प्रेक्षकांना काय ऐकायला आवडेल यावरुन गायला लागलो. असे त्यांनी त्या शो मध्ये सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.