Oscars 2022 : कॉमेडियन्सला सर्वत्रच धोका, ख्रिसच्या 'कानाखाली'वर परेश रावल बोलले

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील 'कानाखाली' प्रकरणावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून अभिनेते परेश रावल यांनीही या प्रकारचा निषेध केला आहे. हा निषेध करताना त्यांनी थेट रशिया युक्रेन युद्धावरही प्रकाश टाकला आहे.
paresh rawal
paresh rawalgoogle
Updated on

oscars : जागतिक स्तरावर सर्वोच्च मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार नुकताच लॉस एंजेलिस येथे पार पडला. ऑस्करच्या या ९४ व्या पुरस्कार सोहळ्याला एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागले. भर सोहळ्यात एक विनोद खटकल्याने अभिनेता विल स्मिथ याने विनोदी कलाकार ख्रिस रॉक याच्या कानाखाली मारली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला गेला. ऑस्करचे आयोजन करणाऱ्या 'द अकादमी'ने देखील या घटनेवर कारवाई होणार असल्याचे जाहीर केले. या घटनेचे पडसाद आता जगभरात उमटत आहेत. एका विनोदी कलाकाराच्या अभिव्यक्तीवर, खुलेपणावर अंकुश लावला जात आहे का, अशा चर्चांना पेव फुटले आहे.

paresh rawal
विशाखा सुभेदार हास्यजत्रेतून बाहेर, कारण सांगणारी भाऊक पोस्ट...

बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेते आणि विविध विषयांवर आपले परखड मत मांडणारे परेश रावल (paresh rawal) यांनीही ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी त्यांच्या खास उपरोधिक शैलीतून विनोदी कलाकारांची बाजू राखली आहे. ‘आजकाल कॉमेडियन्सला सर्वत्रच धोका आहे. मग तो क्रिस असो किंवा झेलेन्स्की’ अशी धारदार टीका परेश रावल यांनी केली आहे. ऑस्कर प्रकरणावर बोलताना त्यांनी थेट रशिया युक्रेन युद्धाशी (russia ukrain crisis) या घटनेचा संबंध जोडला आहे.

paresh rawal
दर दहा वर्षांनी सैफ होतोय बाबा, करीना म्हणतेय, आता तरी थांबा..

हा संबंध जोडण्यामागे कारणही तसेच आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विनोदी कलाकार ख्रिस रॉक सह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलडिमिर झेलेन्स्की यांचा उल्लेख केला आहे. झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी लोकप्रिय विनोदी अभिनेते होते. सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाने जगाला हादरवून सोडले आहे. याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष असलेला एक कलाकार माणूस आज कशा पद्धतीने संकटात अडकला आहे याची जाणीव परेश रावल यांनी करून दिली. म्हणूनच अत्यंत सूचक पद्धतीने त्यांनी हे ट्विट केले आहे.

दरम्यान विल स्मिथने इन्स्टाग्राम ख्रिस रॉकची माफी मागितली आहे. 'हिंसा ही विषारी आणि विनाशकारी आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मी केलेले वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझी मस्करी करणं किंवा माझ्या कामाची खिल्ली उडवण्यापर्यंत ठीक होतं पण जेडाच्या वैद्यकीय स्थिती समजून न घेता तिची खिल्ली उडवल्याने माझा सहनशक्तीचा अंत झाला. मी भावनेच्या भरात हे पाऊल उचलले. ख्रिस या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे,' असे विल स्मिथने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()