Parineeti Chopra: बहिणीलाही काकणभर सरस ठरली परिणीती, चुकून आली होती बॉलीवूडमध्ये..

कमी वेळातच बॉलीवुड गाजवणाऱ्या परिणीतीचा आज वाढदिवस, जाणून घेऊया तिचा थक्क करणारा प्रवास..
Parineeti Chopra birthday she doesn't wants to career in film industry want to become investment banker
Parineeti Chopra birthday she doesn't wants to career in film industry want to become investment bankersakal
Updated on

Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. बी टाऊनच्या टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते. परिणीतीची मोठी चुलत बहीण म्हणजे प्रियंका चोप्रा. प्रियंका नंतर जवळपास १० वर्षांनी परिणीती या बॉलीवुडमध्ये आली. पण आपल्या मेहनतीच्या जीवावर तिने तोडीसतोड काम केले. आज दोघीही बहिणी बॉलीवुड गाजवत असून, त्यामध्ये परिणीती काकणभर सरस ठरली असेही म्हणता येईल. पण परिणीतीला बॉलीवुड मध्ये येण्यात काहीही रस नव्हता. तिचा बँकिंग क्षेत्रात करियर करायचे होते. पण ती अनावधानाने इथे आली आणि अल्पावधीतच सुपरस्टार झाली. अशा परिणीतीचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिचा प्रवास..

(Parineeti Chopra birthday she doesn't wants to career in film industry want to become investment banker)

Parineeti Chopra birthday she doesn't wants to career in film industry want to become investment banker
Kedar Shinde: १७ वर्षांनंतर.. केदार शिंदेंनी सांगितलं अजय-अतुल सोबतचं खास नातं

परिणीतीचा (parineeti chopra) आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी  हरियाणातील अंबाला येथे झाला. परिणीतीचे प्राथमिक शिक्षण अंबाला येथे झाले. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने तिला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आले. त्यांनंतर तिने शिक्षणातही चांगली मजल मारली.

Parineeti Chopra birthday she doesn't wants to career in film industry want to become investment banker
Baby On Board: बाळाची चाहूल लागल्यावर नेमकं काय होतं? 'बेबी ऑन बोर्ड'चा धमाल ट्रेलर

परिणीती शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये होती. तिने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले असून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स केले. टिके शिक्षण घेतल्यानंतर तिला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे होते. पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण 2009 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे तिला भारतात परत यावे लागले. भारतात परल्यावर तिने लगेचच मुंबईत यशराज फिल्म्समध्ये मार्केटिंग विभागात नोकरी स्वीकारली.

यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग विभागात काम करत असताना यशराजचे आदित्य चोप्रा यांनी तिच्यातील टॅलेंट ओळखले आणि तिला बॉलीवुडचे दार उघडले. हळू हळू त्यांनी तिला बॉलीवुडमध्ये सहभागी करून घेतले. ही अभिनयात काहीही कसर सोडणार नाही याची जाणीव होताच आदित्य चोप्रा यांनी परिणीताला चित्रपटासाठी विचारले.

Parineeti Chopra birthday she doesn't wants to career in film industry want to become investment banker
Prarthana Behere: श्रेयस-प्रार्थनाचा रोमान्स पाहून नवऱ्यानेच केली कमेंट, म्हणाला..

'इश्कजादे' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली परिणीती बॉलीवुड गाजवणार ही चोप्रा यांना लक्षात येताच त्यांनी परिणीतीला आणखी तीन चित्रपटांसाठी कास्ट केले. त्यांनंतर तिने शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. काही दिवसांपूर्वी तिचा 'कोडनेम तिरंगा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात परिणीतीसोबतच हार्डी संधू यांच्यासोबत शरद केळकर, रजत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()