Parineeti-Raghav Chadha Wedding Date : 'आता पुन्हा म्हणू नका सांगितलं नाही, लग्नाला यायचं हं!'

मनोरंजन क्षेत्रामध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा यांची जोडी टॉक ऑफ द टाऊन आहे. फोटो आणि व्हिडिओमुळे ते लाईमलाईटमध्ये आहेत.
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date Announced
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date Announced
Updated on

Parineeti Chopra-Raghav Chadha : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर राघव यांना काही जणांनी आता लग्नाची तारीख कधी असा प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. यासगळ्यात परिणीती अन् राघव यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिणीती ही तिच्या लग्नाच्या बातमीवरुन चर्चेत आली आहे. तिच्या साखरपुड्याच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. साखरपुड्याला बरेच दिवस उलटले तरी लग्नाच्या तारखेविषयी कोणतीही बातमी न आल्यानं चाहत्यांना प्रश्न पडला होता. त्याबाबतची एक बातमी सध्या नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. परिणीतीचा होणारा पती राघव चढ्ढा यांनी देखील दिलेल्या एका प्रतिक्रियेनं सोशल मीडियावर चर्चा होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date Announced
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

मनोरंजन क्षेत्रामध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा यांची जोडी टॉक ऑफ द टाऊन आहे. फोटो आणि व्हिडिओमुळे ते लाईमलाईटमध्ये आहेत. त्यांचे लग्न कधी होणार असा प्रश्न केवळ चाहत्यांनाच नाहीतर बॉलीवूड सेलिब्रेटींना देखील आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. १३ मे रोजी या दोन्ही सेलिब्रेटींचा साखरपूडा झाला होता. दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला होता. यावेळी राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळे सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या २५ सप्टेंबर रोजी हे दोन्ही सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या दोघांकडून अधिकृतपणे कुठलेही उत्तर आलेले नाही. त्यांनी त्याविषयी सांगितलेही नाही. मात्र रिपोर्टनुसार, लग्नाच्या दहा दिवसांपूर्वी जंगी सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. त्याच्या तयारीलाही वेग आला आहे. ग्रँड वेडिंग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

परिणीती आणि राघव चड्डा यांच्या लग्नाला मनोरंजन, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बडे सेलिब्रेटी हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे असंही म्हटले जात आहे की, हे दोन्ही सेलिब्रेटी राजस्थानमध्ये विवाहबद्ध होणार आहे. बहिण प्रियंका सारखे ग्रँड सेलिब्रेशन करण्याचा परिणीतिचा मानस असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.