Parineeti- Raghav Lovestory: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा आज दिल्लीत साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील कपूरथला हाऊसमध्ये दोघंजण जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र अनेकदा स्पॉट केले गेले. साखरपुड्याची तारीख समोर आली तरी दोघांनी अधिकृतरित्या यावर बोलणं टाळलं.आता जेव्हा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा होतच आहे तर चला जाणून घेऊया दोघांच्या लव्ह स्टोरी विषयी..
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा दोघंजण काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून एकत्र बाहेर येताना दिसले आणि दोघांच्या डेटिंगच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसले.
दिल्लीमध्ये आयपीएल मॅच पहायला गेल्यावर दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं. त्यावेळी राघव यांच्या खांद्यावर डोकं टेकलेल्या परिणीतीचा फोटो जोरदार व्हायरल झाला. चला आता दोघांची ही प्रेम कहाणी कुठे,कधी आणि कशी सुरू झाली ते जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये एकत्रच शिकले आहेत. बोललं जातं की त्या दरम्यानच त्या दोघांची ओळख झाली होती. अर्थात त्यावेळी फक्त दोघे एकमेकांचे मित्र बनले पण प्रेम मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये फुललं.
ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पुन्हा भेटले ते पंजाबमध्ये. त्यावेळी परिणीती गेल्या वर्षी तिच्या चमकीला सिनेमाचं शूटिंग करत होती. त्यादरम्यान राघव चड्ढा यांच्याशी तिची भेट झाली. आणि त्यावेळची ती एक भेटच दोघांमधील मैत्रीच्या नात्याला पुढे नेणारी ठरली.. पण दोघांनी कुणालाच आपल्या नात्याची कानोकान खबर लागू दिली नाही.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आता आपल्या दोघांच्या नात्याला एका सुरेख बंधनात बांधण्यास निघाले आहेत. पण अद्याप या दोघांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून साखरपुड्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दोघांनी भले यावर मौन साधलं असलं तरी त्यांच्या जवळच्या लोकांकडनं बरंच काही समोर आलं आहे. मार्चमध्ये हार्डी संधूनं राघव आणि परिणीतीच्या नात्याला कन्फर्म केलं होतं. याव्यतिरिक्त आप नेता संजीव अरोरा यांनी देखील ट्वीट करत राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.