जगात मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पॅरिस फॅशन वीककडे सगळ्यांचं लक्ष असतं. या मानाच्या इव्हेंटमध्ये अनेक सौंदर्यवती त्यांच्या सौंदर्याची दखल जगाला घ्यायला भाग पाडतात.
या फॅशन शोमध्ये जगभरातल्या सौंदर्यवती त्यांच्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालतात. अगदी अभिनेत्री ऐश्वर्या राय, नव्या नवेली नंदा अशा अनेक भारतीय सौंदर्यवतींनी सुद्धा या फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. अशातच महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासांठी आनंदाची गोष्ट अशी की, या फॅशन वीकमध्ये डोंबिवलीच्या मैथिली भोसेकरने हजेरी संपूर्ण जगाला तिच्या सौंदर्याची दखल घ्यायला भाग पाडलं.
२५ सप्टेंबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३ मध्ये पॅरिस येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन वीक मध्ये मूळची डोंबिवलीची असणारी डॉ. मैथिली भोसेकर हिने आपला ठसा चांगलाच उमटवला.
डॉ. मैथिली हिने फ्लोरिडा इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत विजयी होऊन "मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३" हा किताब पटकावला आहे. तिची पॅरिस फॅशन वीक साठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
उच्च फॅशनच्या जगात पॅरिस सारख्या नयनरम्य शहरात डोंबिवलीच्या डॉ. मैथिलीने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या प्रत्येक पावलांनी प्रेक्षकांना भुरळ घातली व ती आत्मविश्वासाने चालत राहिली. (Latest Marathi News)
हायटेक मोडा निर्मित TIGP कटुर या डिझायनर ब्रँड साठी मैथिलीने Le Salon des Miriors या ठिकाणी मॉडेल म्हणून कामगिरी बजावली आणि आपली चांगलीच छाप पाडली. मैथिली ही पेशाने डेंटिस्ट असून मॉडेलिंग ही तिची आवड तिने मनापासून जोपासली आहे.
फॅशन आणि सौंदर्याच्या जगात तिने स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. तिला या साठी डॉ. अक्षता प्रभू CEO "धी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट" यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
परदेशात राहूनही डॉ. मैथिली हि भारतीय संस्कृती जपणारी बहुगुणसंपन्न व महत्वाकांक्षी मॉडेल म्हणून चमकत आहे. मैथिलीने पॅरीस फॅशन वीकमध्ये हजेरी लावल्याने महाराष्ट्राला आणि डोंबीवलीकरांना तिचा अभिमान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.