Pathaan Box office Collection: ये नही रुकने वाली!, 'पठाण'ने 13व्या दिवशी केले इतक्या कोटींचे कलेक्शन

किंग खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पठाण' बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.
Pathaan Movie
Pathaan MovieSakal
Updated on

सुपरस्टार शाहरुख खानचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन शानदार ठरले आहे. किंग खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पठाण' बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे 'पठाण'ची कमाई दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

रिलीजच्या दोन आठवड्यात 'पठाण' ब्लॉकबस्टर ठरला आहे. अशा परिस्थितीत, कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम करणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने रिलीजच्या 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट ठरलेला शाहरुख खानचा 'पठाण' सध्या यशाच्या रथावर स्वार आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचे कलेक्शन करणाऱ्या 'पठाण'ने सुरूवातीलाच हे दाखवून दिले होते की हा स्पाय थ्रिलर चित्रपट यापुढेही अनेक मोठे रेकॉर्ड बनवेल.

12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'पठाण'ने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. दरम्यान, 'पठाण'ने दुसऱ्या सोमवारीही कलेक्शनच्या बाबतीत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

Pathaan Movie
Raveena Tandon: रवीना टंडनला चित्रपटात 'किसिंग सीन' करायचे नव्हते तर रेप सीनच्या शूटिंगसाठी ठेवली होती ही अट

रिपोर्टनुसार, 'पठाण'ने रिलीजच्‍या 13 व्‍या दिवशी 9 कोटींचे उत्‍तम कलेक्‍शन केले आहे. विशेष म्हणजे 25 जानेवारीला रिलीज झालेला शाहरुख खानचा 'पठाण' अजूनही दुहेरी अंकात कमाई करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' या चित्रपटाने बॉलिवूड इंडस्ट्रीत कमाईचा नवा इतिहास रचला आहे. आतापर्यंत 'पठाण'ने कलेक्शनच्या बाबतीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे चित्रपट मागे टाकले आहेत.

त्यामुळे 'पठाण'चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 420 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. त्याचवेळी पठाणच्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनने 800 कोटींचा आकडा पार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.