Pathaan Box Office: शाहरुखच्या पठाणची सिंगापूरमध्ये रेकॉर्डब्रेक ओपनिंग, न्यूझीलंड-यूएसएमध्ये बंपर कमाई

पठाण रिलीज होण्यापूर्वीच सतत वादांना तोंड देत होता. पण या वादांचाही पठाणच्या ओपनिंग कलेक्शनवर काहीही परिणाम झाला नाही.
Pathaan Movie
Pathaan MovieSakal
Updated on

शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. आदल्या दिवशी प्रदर्शित झालेला सुपरस्टारचा पठाण हा चित्रपट सतत चर्चेत आहे. जो कोणी हा चित्रपट पाहत आहे तो शाहरुखचेच कौतुक करत आहे. पठाण रिलीज होण्यापूर्वीच सतत वादांना तोंड देत होता. पण या वादांचाही पठाणच्या ओपनिंग कलेक्शनवर काहीही परिणाम झाला नाही. पठाणने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाहुबली आणि केजीएफचे रेकॉर्ड तोडले आहेत.

पठाणच्या सुरुवातीच्या आकड्यांबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने भारतात सुमारे 54 कोटींचा व्यवसाय करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, अॅडव्हान्स बुकिंग दरम्यानच चाहत्यांचे चित्रपटावरील प्रेम स्पष्टपणे दिसून आले.

या मोठ्या कमाईनंतर पठाण शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर फक्त पठाणचाच दबदबा आहे. याशिवाय पठाणने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांच्या प्रचंड आनंद झाला आहे.

Pathaan Movie
Republic Day 2023 Celebrity Wishesh: बॉलीवूड ते साऊथ.. या कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे की पठाणने पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, पठाणने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

शाहरुख खानने UAE आणि सिंगापूरमध्ये नंबर 1 डेब्यू झाले आहे. शाहरुख जगावर राज्य करेल. मिळालेल्या माहितीनुसार, पठाणने रिलीजच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडमध्ये 88 लाखांहून अधिक, ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे 5 कोटी आणि यूएसएमध्ये 6.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

ट्रेड अॅनालिस्टच्या या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, राजा परत आला आहे. आणखी एका युजरने लिहिले की, बादशाह परत आला आहे".

आपल्या सुपरस्टारच्या या दमदार कमबॅकमुळे शाहरुख खानचे चाहते खूप खूश आहेत. तसेच ठिकठिकाणी चित्रपटातील स्टार्सची पोस्टर्स जाळली जात आहेत. अनेक ठिकाणचे शोही रद्द करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी असूनही पठाणच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.