Pathaan: 'पुजेचा अधिकार सगळ्यांनाच पण..', आमिर, शाहरुखच्या पुजेवर गृहमंत्री बोलले

शाहरुख खानचा पठाण हा आता भलताच चर्चेत आला आहे. नव्या वर्षात तो प्रदर्शित होणार आहे.
Pathaan movie
Pathaan movie esakal
Updated on

Pathaan Boycott BJP Narottam Mishara home minister reaction: शाहरुख खानचा पठाण हा आता भलताच चर्चेत आला आहे. नव्या वर्षात तो प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याच्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या वादाला तोंड फुटले आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान आणि शाहरुखनं पूजा केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

आमिर खाननं किरण राव सोबत गृहकलश पूजा केली होती. त्याचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हाापासून तो चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी त्याला वेगवेगळया प्रतिक्रिया देऊन ट्रोल केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर शाहरुखनं देखील काही दिवसांपूर्वी गोल्डन टेम्पलला भेट दिली होती. त्यावेळी त्याचा मुलगा अब्रामही सोबत होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शाहरुखचा नवीन चित्रपट येतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. त्याच्या आणि दीपिकाच्या बोल्ड सीनमुळे तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. दीपिकानं परिधान केलेली भगवी बिकीनी ही नेटकऱ्यांना खटकली आहे. या साऱ्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी केल्या आहेत. त्यात मध्यप्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शाहरुखच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

Pathaan movie
Deepika Padukone: 'बेडखाली चप्पल शोधतेयस का?', 'बेशरम रंग' गाण्यातील हूक स्टेपवरनं दीपिका ट्रोल...

आता मिश्रा यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे त्यात ते म्हणतात, सर्वांना त्यांच्या आस्थेनुसार पुजा करण्याचा अधिकार आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशा शब्दांत शाहरुख, आमिरचे नाव न घेता त्यांना टोमणा मारला आहे. यापूर्वी त्यांनी शाहरुख आणि दीपिकाच्या पठाणला तीव्र शब्दांत विरोधही दर्शवला आहे.

Pathaan movie
Ranveer Singh Video: या अभिनेत्यासाठी रणवीर फाडफाड मराठी बोलला! चाहते खुश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.