Pathaan Controversy: पुण्यात बजरंग दलाचा राडा! 'पठाण'चं पोस्टर फाडलं...

Pathaan Controversy
Pathaan ControversyEsakal
Updated on

शाहरुख खानचा विवादित चित्रपट 'पठाण' हा येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वीच बराच गोंधळ निर्माण झाला आहे. या चित्रपटातील गाण्याला विरोध झाला आणि आता तो विरोध वाढू लागला आहे.

Pathaan Controversy
Pathaan: साध्वी प्राची यांना 'पठाण' ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पचेना! ट्विट करत म्हणाल्या, 'शाहरुख तू'

एकीकडे पठाण चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगला भारतात दमदार प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे अजूनही बऱ्याच संघटना हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाविरोधात प्रदर्शने केली आहेत. शाहरुखचे आणि चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात आले.

Pathaan Controversy
Pathaan Controversy: आसामच्या मुख्यमंत्र्याना किंग खानचा मध्यरात्री फोन म्हणाला,..

आता या प्रकरणाचे पडसाद पुण्यातही दिसत आहे. पुण्यातही पठाण चित्रपटाचे पोस्टर काढण्यात आले.पुण्यातील राहुल टॉकीज बाहेर लावण्यात आलेले पठाण सिनेमाचे पोस्टर बजरंग दलने काढले. शाहरुख खानच्या काही चाहत्यांच्या ग्रुप ने चित्रपटगृहाबाहेर त्याच्या चित्रपटाचं भलंमोठं पोस्टर लावलं होतं. बजरंग दलाकडून राहुल टॉकीज च्या चालकांना इशारा देऊन हे पोस्टर काढण्याची विनंती केली.

Pathaan Controversy
Pathaan Movie Release : दर दुप्पट असूनही ‘पठाण’ नाशिकमध्ये हाउसफुल्ल!

त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये अंदोलकाने असे पोस्टर लावु नये असा इशारा दिला. पठाण चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, त्याचबरोबर थेटर मालकांना असे पोस्टर लावू नये अशी विनंती केली आहे. जोरदार घोषणाबाजी करत पठाणचं पोस्टर फाडण्यात आलं.

Pathaan Controversy
Pathaan Movie: 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखची हवा! मन्नत बाहेर चाहत्यांची जत्रा

'पठाण' २५ जानेवारीला रिलीज होत आहे आणि सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी 'पठाण' तगडी कमाई करेल असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.