Pathaan: शाहरुख खानला तब्बल ४ वर्षानंतर चाहते मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत. 'पठाण' उद्या २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. आणि यासोबतच चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे.
'पठाण' सिनेमाच्या ट्रेलर आधी त्यातील पहिलं गाणं 'बेशरम रंग' रिलीज झालं होतं, तेव्हा त्या गाण्याला घेऊन वाद रंगला. सिनेमात शाहरुख खान सोबत मुख्य भूमिकेत असणारी दीपिका पदूकोण गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालून नजरेस पडली अन् वादाची ठिणगी पेटली.
या गाण्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला गेला आणि अनेक प्रकारे गाण्याला ट्रोल केलं गेलं. गाण्यामुळे देशभरात वाद पेटला. अनेक राजकीय नेत्यांपासून कितीतरी संघटनांनी वादात उडी घेत पठाण विरोधात आंदोलनं छेडली.
अगदी सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी केली गेली. पण आता या सगळ्या वादानंतर शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे.(Pathaan: No Protest for Shahrukh Khan pathaan in gujrat by bajrang dal)
पठाण विरोधात अनेक शहरात आंदोलन छेडण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं सर्वात आधी पुढाकार घेतला होता. पण आता माहिती समोर येत आहे की या संघटनांनी त्यांचा विरोध मागे घेतला आहे. गुजरात मध्ये विश्व हिंदू परिषदचे मंत्री अशोक रावल यांनी याप्रकरणात अधिकृत निवेदन पत्र जारी केलं आहे.
आपल्या वक्तव्यात त्यांनी 'पठाण' सिनेमात बदल करण्यास निर्मात्यांना सांगितले यासाठी सेन्सॉर बोर्डाची प्रशंसा केली आणि म्हटलं की आता सिनेमा पहायचा की नाही हे संपूर्णपणे जनतेचा निर्णय असेल.
हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी
अशोक रावल यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की,''हिंदी सिनेमा 'पठाण' मध्ये सेन्सॉर बोर्डानं बजरंग दलाच्या विरोधानंतर अनेक बदल सूचित केले होते. अश्लील गाणं आणि गाण्यातील काही घाणेरडे शब्द हटवण्यात आले आहेत. जी चांगली बातमी आहे''.
''धर्म -संस्कृतीची रक्षा करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला संघर्ष यशस्वी ठरला आहे. त्यासाठी मी समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन करतो''.
ते पुढे म्हणाले की,''यासोबतच मी सेन्सॉर बोर्ड, निर्माता वर्ग आणि थिएटर मालकांना सांगू इच्छितो की त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमधील एक महत्त्वाचे घटक म्हणून वेळीच धर्म,संस्कृती आणि देशभक्ती यावरनं सिनेमात काही छेडछाड होणार नाही याकडे जाणीपूर्वक लक्ष द्यावे. तसं झालं तर बजरंग दल आणि हिंदू समाजाला काहीच आक्षेप नसेल''.
भारत माता की जय..जय श्री राम म्हणत शेवटी अशोक रावल म्हणालेयत,''सिनेमा पहायचा की नाही हे आता आम्ही गुजरामधील जनतेवर निर्णय सोडतो''.
२५ जानेवारीला 'पठाण' थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. रिलीजच्या एक दिवस आधी अशोक रावल यांनी निवेदनाच्या माध्यमातून केलेलं वक्तव्य आता शाहरुखच्या चाहत्यांमध्ये 'पठाण' पाहण्याचा उत्साह दुपटीनं वाढवेल. आता लक्ष आहे 'पठाण' बॉक्सऑफिसवर किती धुमाकूळ घालतोय त्याकडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.