बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान चार वर्षांनंतर 'पठाण' या बहुप्रतिक्षित चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत चाहतेही 'पठाण'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यामध्ये 'पठाण'ची ओटीटी रिलीज डेटही समोर आली आहे.
शाहरुख खानचा अॅक्शन चित्रपट 'पठाण' थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या नऊ दिवस आधी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी यशराज फिल्म्सला OTT रिलीजसाठी चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पठाणला 25 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केले जाऊ शकते हे उघड झाले आहे.
दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तर 'पठाण'चा प्रीमियर 25 एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर होणार आहे. त्यापूर्वी ते पुन्हा री-सर्टिफिकेशनसाठी सीबीएफसी कडे पुन्हा सबमिट करावे लागेल.
OTT प्रकाशनासाठी हिंदी सबटायटल्स, क्लोज्ड कॅप्शन तसेच ऑडिओ डिस्क्रिप्शन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाने सीबीएफसीला दिलेल्या निर्देशांनुसार बदल करून पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.
अहवालानुसार, न्यायालयाने निर्मात्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सीबीएफसीला 10 मार्चपर्यंत निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जवळ आल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याबाबत न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट एप्रिलमध्ये ओटीटीवर येणार आहे, त्यामुळे ओटीटी व्हर्जनमध्ये सर्व बदल करणे आवश्यक आहे. अॅक्शन-थ्रिलर 'पठाण'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे आणि पठाण 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.