Pathaan: 'ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं... ' 'पठाण' पाहण्यासाठी जबरा फॅन कुटुंबासह बांगलादेशातून थेट भारतात

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत असतानाच 'किंग खान'च्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
Shah Rukh Khan Fans
Shah Rukh Khan FansSakal
Updated on

शाहरुख खानच्या कमबॅकने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याच्या 'पठाण' या कमबॅक चित्रपटाची चाहत्यांची क्रेझ खूप वाढत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत असतानाच 'किंग खान'च्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शाहरुख खानची केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रचंड फॅन फॉलोअर्स आहे आणि याच कारणामुळे 'पठाण'ने रिलीजच्या अवघ्या 10 दिवसांत जवळपास 725 कोटी रुपयांचे जगभरात कलेक्शन केले आहे.

दरम्यान, शाहरुख खानच्या एका जबरा फॅनचीही बातमी समोर आली आहे, ज्याच्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. बांगलादेशच्या या चाहत्याने 'पठाण'च्या क्रेझची हद्द ओलांडली आहे. तो चित्रपट पाहण्यासाठी 130 किलोमीटर अंतरावर पोहोचला, तोही बांगलादेशमध्ये चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे.

Shah Rukh Khan Fans
Aashiqui 3 : एक्स गर्लफ्रेंड सोबत कार्तिक आर्यन पुन्हा करणार रोमान्स, फॅन्स म्हणाले... असं करु नको भावा

'पठाण' परदेशात 2500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. काही कारणांमुळे हा चित्रपट बांगलादेशात प्रदर्शित झालेला नाही. पण शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ एवढी आहे की तो कसाही असला तरी तो चित्रपट बघायलाच हवा.

असाच एक चाहता 'पठाण' पाहण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह बांगलादेशच्या ढाका शहरातून भारतातील त्रिपुराला पोहोचला. तेही फक्त थिएटरमध्ये 'पठाण' पाहण्यासाठी. आगरतळा येथील सिनेमा हॉलचे मालक सतदीप साहा यांनी ही माहिती दिली आहे.

सतदीप साहा यांनी ट्विटरवर लिहिले की, 'हे खूप मनोरंजक आहे. पठाणला पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह बांगलादेशातून लोक भारतात येत आहेत. सतदीपने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तो लिहितो, 'रुपसी सिनेमा, आगरतळा येथे आल्याबद्दल धन्यवाद.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()