या वर्षी सुरुवातीला महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळेंच्या आयुष्यावर आधारीत असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली नसली तरीही काही प्रेक्षकवर्गाला सिनेमा नक्कीच आवडला.
महाराष्ट्र शाहीर नंतर आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा म्हणजे पठ्ठे बापूराव. आज असलेल्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पठ्ठे बापूराव सिनेमाची घोषणा झालीय. यानिमित्ताने चंद्रमुखी नंतर प्रसाद पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आहे. आणि प्रमुख भुमिकाही साकारणार आहे.
(Patthe Bapurao marathi Movie prasad oak and amruta khanvilkar in lead role)
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी "कच्चा लिंबू", "हिरकणी", "चंद्रमुखी" अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे.
आता प्रसाद शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आले.
पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला.
पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.
स्वरुप स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे,सपना लालचंदानी हे "पठ्ठे बापूराव" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे. श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत "पठ्ठे बापूराव" या नावानं प्रसिद्ध झाले. सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.