Pavitra Punia Father Death: बिग बॉस 14 फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन! कुटूंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

पवित्रा पुनियाच्या वडिलांचे निधन झाले आहे. खुद्द अभिनेत्रीने ही माहिती दिली आहे.
Pavitra Punia Father Death
Pavitra Punia Father DeathEsakal
Updated on

Pavitra Punia Father Death: बिग बॉस 14 फेम अभिनेत्री पवित्रा पुनियाबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. पवित्राच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील कुशल पाल सिंग यांचे 6 नोव्हेंबर रोजी निधन झाले. तिचे वडील निवृत्त दिल्ली पोलीस अधिकारी होते. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. काही दिवसांपुर्वी ते मुंबईच्या घरात पडले होते.

Pavitra Punia Father Death
Shyamchi Aai Review: श्यामची आई पाहायला जाताय? तर मग हे एकदा वाचाच!

त्यांचा मृत्यू कसा झाला आणि पवित्राच्या कुटुंबाची सध्या काय स्थिती आहे याबाबत पवित्राने स्वतःच खुलासा केला आहे.

तिच्या वडिलांच्या निधनाबाबत बोलताना पवित्रानं सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती. ते मुंबईतील फ्लॅटची बाल्कनी साफ करताना पडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती बरी होती मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडली.

त्यामुळे तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणले मात्र पुन्हा 6 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यातच पवित्राच्या वडिलांचे निधन झाले.

Pavitra Punia Father Death
Salim-Javed : 'कशाला गरीब लेखकांची चेष्टा करता राव'! सलीम-जावेद यांनी घेतली रितेशची शाळा

पुढे पवित्रा म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यातील वाईट टप्प्यातून जात आहे. त्यांना अचानक काय झालं हे आम्ही समजू शकलेलो नाही. माझा मोठा भाऊ आणि माझी आई त्यांची काळजी घेत होते. आता मला माझ्या कुटुंबासाठी धाडस दाखवावं लागेल.

Pavitra Punia Father Death
Anushka Sharma: गुड न्यूज खरी आहे तर! अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? व्हायरल व्हिडीओची चर्चा

आपल्या वडिलांबद्दल सांगताना ती म्हणते की, तिचे वडिल खुप सकारात्मक व्यक्ती होते. आयुष्यातील अडचणींवर त्यांनी मात केली होती. गेल्या वर्षापर्यंत ते काम करत होते, नंतर त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर ते पवित्रासोबतच राहत होते.

आशीर्वाद देण्यासाठी वडिलांचा हात आता तिच्या डोक्यावर नाही, या विचाराने तिला भीती वाटते. सध्या तिच्या मनात त्यांच्या आठवणींशिवाय दुसरा विचार नाही. असं ती सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.