'लॉकअप'(Lockupp) शो ची होस्ट कंगना(Kangana) असल्यावर तिथे मीठमसाला लावून रंगवलेली जोरदार भांडणं,वाद,मारामारी पहायला मिळायलाच हवी नाही का. एकता कपूरनं उगाच कंगनाची निवड होस्ट म्हणून केली नाही काही. तर असो,'लॉकअप' मध्ये आता आणखी एक मोठा वाद सध्या झालेला पहायला मिळतोय. वादग्रस्त वक्तव्य करून सुरुवातीपासूनच चर्चेत असेलली पायल रोहातगी(Payal Rohatgi) आणि सायशा शिंदे(Saisha Shinde) मध्ये पुन्हा घाणेरडं भांडणं झालेलं पहायला मिळालं. यात दोघींनीही एकमेकींवर वेगवेगळ्या प्रकारानं लांच्छन तर लावलंच पण कॅमेऱ्याचं भान नं ठेवताही बेताल भाष्य केलेलं दिसून आलं.
शो मध्ये सध्या एका 'प्ले' ची तालिम सुरू असताना पायलनं मुन्नावरला 'बाबुजी' हा शब्द बदलून तिथे 'बाबू साहिब' किंवा 'नेताजी' शब्द वापरुया असं सुचित केलं. तीचा त्या शब्दावर आक्षेप होता. ती म्हणाली,'' मला हा शब्द खटकतो''. पण मुन्नावर आणि इतर सदस्यांनी मात्र यावर सहमती दर्शवली नाही. मुन्नावर म्हणाला,''ठीक आहे,बाबुजी शब्द बदलूया,पण तू लिही नवीन स्क्रिप्ट''. पण त्यावर ती म्हणाली,''मला फक्त विचार करुन बदलूया एकमतानं हा शब्द असं बोलायचं होतं,तू एवढं टोकाचं का बोलतोयस?''
तेव्हा सायशा शिंदेनं पायलला उगाचं काहीतरी बोलून गोंधळ घालू नकोस असं सूचित केलं. तेव्हा पायल चिडून म्हणाली,''तू माझी आई नाहीस''. तेव्हा सायशा म्हणाली,''मी प्रेमाने तुला बोलले होते पायल,तू यातही वाद का करतेयस. मी तुझी आई नक्कीच नाही. उगाच काहीही बोलू नकोस. जेव्हा बघावं उगाच वाद सुरु करते. स्वतःचं पहा पहिलं,मला तुझी आई बनायचंही नाही''. पायल सायशावर चिडून म्हणाली,''मी जेव्हा काही बोलायचा प्रयत्न करते तेव्हा-तेव्हा तू उगाच मध्ये येतेस आणि बोलतेस''.
सायशा 'लॉकअप'मधील धुम्रपान विभागात गेली आणि म्हणाली,''हिला काही रोल मिळत नाहीत यात मला आश्चर्य वाटत नाही. कोणाला तिच्यासोबत काम करायचं असेल? म्हणून इतक्या वर्षांपासून हिला काही काम मिळत नाही. हिची आई बनायला कोणाला आवडेल? हिच्यासारखी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी''. पायल तेव्हा सायशाजवळ येऊन म्हणाली,''तू जेव्हा म्हणालीस तु माझी आई नाहीस,तेव्हा तुला काय वाटतं मी कसं रिअॅक्ट व्हायला हवं होतं? मी फक्त माझा विचार मांडलेला,मला वाद घालायचाच नव्हता. मला कोणाचाच अनादर करायचा नव्हता''. त्यावर सायशा म्हणाली,''हे मी ठरवीन,माझा तू अनादर केलायस की नाहीस ते?'' तेव्हा मुन्नावरही मध्येच या वादात पडून सायशाला म्हणाला,''पायलनं स्वतःचं जरा डोकं वापरायला शिकलं पाहिजे. हिला बाबूजी शब्द खटकतोय. स्वतः इतक्यांदा काहीही बरळत असते त्याचं काहीच नाही का?'' आता हे सगळं यांच्यात चालतंच म्हणून सोडून द्यावं म्हटलं तरी यांनी यांच्या भांडणात आईला कुणाच्याही आणायला नको हवं होतं असा सूर उमट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.