आमच्याजवळ पुरावे, पर्ल वी पुरी प्रकरणावर डीसीपींचे एकताला उत्तर...

आता या प्रकरणावर डीसीपी संजय कुमार पाटील (sanjay kumar patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
pearl v puri
pearl v puri Team esakal
Updated on

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेता पर्ल वी पुरी (pearl v puri) च्या प्रकरणावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच ते त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्टही (social media) करु लागले आहेत. यात निर्माती एकता कपूर, सुरभि ज्योती, करिश्मा तन्ना, अनिता हसनंदानी, निया शर्मा, रक्षंदा खान, निक्की शर्मा, अली गोनी आणि दिव्या खोसला कुमार यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्ल वी चे प्रकरण चर्चेत आहे. ( pearl v puri dcp says arrested him because we have evidence )

आता या प्रकरणावर डीसीपी संजय कुमार पाटील (sanjay kumar patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलयं की, पर्लवर झालेले आरोप काही खोटे नाहीत. याचे कारण आमच्याकडे पुरावे आहेत. करण आणि निशा प्रकरणानंतर आता टीव्ही मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. नागिन 3 मधील अभिनेत्री पर्ल वी पुरीला पोलिसांनी अटक केली आहे. तिला पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत (poccso) अटक केली आहे. त्यानं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. जेव्हा पर्लला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या बाजूनं अनेक सेलिब्रेटी उभे राहिले आहेत. त्या सगळ्यांनी पर्ल हा निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्याला या प्रकरणात अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणावर डीसीपी संजय कुमार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

pearl v puri
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पर्लला न्यायालयीन कोठडी
pearl v puri
The Family Man 2: जे.के. तळपदेनं अभिनयासाठी सोडली नोकरी, विकले पत्नीचे दागिने

संजय कुमार पाटील यांच्या पत्रकार परिषदेची क्लिप व्हायरल होत आहे. त्यात पाटील यांनी सांगितले की, याप्रकरणात केलेले आरोप काही खोटे नाहीत. त्याचा तपास सुरु आहे. त्याच्याविरोधात पुरावे आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोर्टात त्याचा काय तो निर्णय होईल. यावेळी एकतानं सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, मी बलात्कार करणा-या कुठल्याही व्यक्तीचे समर्थन करणार नाही. मात्र मदत करणा-यावर जेव्हा बलात्काराचा आरोप होतो तेव्हा काही चूकीचे झाले आहे. असे सांगावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.