'सत्यमेव जयते!' जामिनावर सुटल्यानंतर पर्ल पुरीची पहिली पोस्ट

'या सर्व प्रकरणामुळे मी सुन्न झालोय..'
Pearl v puri
Pearl v puri Team esakal
Updated on

'नागिन ३' फेम अभिनेता पर्ल व्हि. पुरीला Pearl V Puri बलात्कारप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर त्याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. गेल्या काही दिवसांतील त्याच्या खासगी आयुष्यातील घडामोडी सांगत त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आणि कलाकारांचे त्याने आभार मानले आहेत. त्याचसोबत न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं त्याने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. (Pearl V Puri finally breaks silence after accused in minor rape case)

पर्ल पुरीची पोस्ट-

'आयुष्य त्याच्याच परीने लोकांची परीक्षा घेत असते. काही महिन्यांपूर्वी माझ्या आजीचं निधन झालं. तिच्या निधनाच्या १७व्या दिवशीच माझे बाबा हे जग सोडून गेले. त्यानंतर माझ्या आईला कॅन्सरचं निदान झालं आणि आता माझ्यावर होत असलेले हे भयानक आरोप. गेले काही आठवडे हे माझ्यासाठी अत्यंत वाईट होते. रातोरात मला गुन्हेगार ठरवण्यात आलं. माझ्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना हे सर्व घडलं आणि मी हतबल झालो. या सर्व प्रकरणामुळे मी सुन्न झालोय. या कठीण परिस्थितीतही मला पाठिंबा देणाऱ्या मित्रांचे, चाहत्यांचे आणि शुभ चिंतकांचे मी आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. मला सत्यमेव जयतेवर पूर्ण विश्वास आहे. या देशाचा कायदा, न्यायव्यवस्था आणि देव यांच्यावर मला विश्वास आहे', अशी पोस्ट त्याने लिहिली.

Pearl v puri
पत्नीच्या खात्यातून एक कोटी गायब, करण मेहरा अडचणीत
Pearl v puri
इगतपुरी रेव्ह पार्टी: अटक झालेली 'मराठी बिग बॉस' फेम हिना पांचाळ कोण आहे?

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी पर्लला ४ जून रोजी अटक झाली होती. वसई-विरार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर कोर्टात सादर केल्यानंतर पर्लला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर १५ जून रोजी पर्लचा जामिन अर्ज कोर्टाने मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.