'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर लोकांना खटकतोय; कारणही आहे मोठं...

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमा ९ सप्टेंबर,२०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.
'Boycott Brahmastra' Trends on social media
'Boycott Brahmastra' Trends on social mediaGoogle
Updated on

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची चर्चा रंगली आहे तो अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra)सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे . नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला,ज्याला पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात रणबीर कपूर(Ranbir Kapoor),आलिया भट्ट,अमिताभ बच्चन,नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाच्या VFX दृश्यांची जोरदार प्रशंसा केली जात आहे. सिनेमाच्या बॅकग्राऊंड म्युझिकनं देखील लोकांचं मन जिंकलं आहे. या सिनेमातील 'केसरिया' गाण्यानं तर सोशल मीडियावर याआधीच आपला जयजयकार लोकांकडनं करवून घेतला आहे. पण एवढं सगळं असताना ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्वीटरवर #BoycottBrahmasta ट्रेंड होतंय आणि याचं कारणही खूप मोठं आहे.('Boycott Brahmastra' Trends on social media)

'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रणबीर कपूरचा दमदार अभिनय आणि आलिया भट्ट सोबतची त्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडत आहे. ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन आणि अॅडव्हेंचर पहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतोय असं अनेकजण म्हणतायत. अनेकजणांनी तर या सिनेमाची तुलना हॉलिवूडशी केलीय. पण एवढं सगळं सिनेमाविषयी चांगलं सुरु असताना मध्येच आता ट्रेलरमध्ये लोकांनी असं काही पाहिलंय की ज्यामुळे त्यांचा राग अनावर होतोय.

'Boycott Brahmastra' Trends on social media
सिद्धार्थ जाधवचं वैवाहिक आयुष्य अडचणीत? 'त्या' इन्स्टा पोस्टने चर्चेला उधाण

ट्वीटरवर ट्रेलरचा स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. एका सीनमध्ये रणबीर कपूर मंदीरात एन्ट्री करत आहे आणि उंच उडी मारत घंटानादही करताना दिसत आहे. याच सीनला नेमकं लोकांनी पाहिलं की रणबीरनं त्यावेळी पायात बूट घातले आहेत. आता हे पाहिल्यानंतर लोकांनी त्यांचा राग सोशल मीडियावर काढला आहे. आणि सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. एकानं लिहिलंय की,'पायात बूट घालून मंदिरात जाणं...हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. बॉलीवूड नेहमीच सनातन धर्माला दुखवण्याची एकही संधी सोडत नाही'.

दुसऱ्या एका नेटकऱ्यानं ट्रेलरचा स्क्रीन शॉट घेत,रणबीरच्या पायातील बुटाला खुणेनं दाखवत तो ट्वीटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,'पायात बूट घालून मंदिराची घंटा वाजवणं...हाच साऊथ आणि हिंदी सिनेमातील मोठा फरक आहे. साऊथ इंडस्ट्री हिंदू संस्कृतीचा सम्मान करते'.

सुशांत सिंग राजपूतचे काही चाहते देखील बॉयकॉट ट्रेंडमध्ये सामिल होऊन 'ब्रह्मास्त्र'च्या विरोधात उतरले आहेत. काही जुन्या कटू आठवणींना जागवत काही सुशांतच्या चाहत्यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' च्या शो चा एक दाखला दिला आहे. त्या शो मध्ये आलिया भट्ट आली असताना तिनं एका टास्क दरम्यानं सुशांतला किल करण्याच्या पर्यायाची निवड केली होती. तर काहींना करण जोहरच्या त्या पार्टीची आठवण आली,जिच्यात रणबीर सोबतच इतरही काही सेलिब्रिटींवर ड्रग्ज घेण्याचे आरोप लावण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.