Phulala Sugandh Maticha : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'फुलाला सुगंध मातीचा 'लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मालिकेतील प्रमुख नायक शुभम असो,म नायिका किर्ती असो किंवा जिजि आक्का.. ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपल्याच घरातली वाटत होती. पण आता ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.. असे असले तरी वाहिनीने चाहत्यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे.
(Phulala Sugandh Maticha marathi serial on star pravah off air soon and again telecast from 5 december)
काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की शुभम आणि जिजि आक्का यांच्या बसला दहशतवादी घेराव घालतात. त्यांच्यावर हल्ला करतात. या दरम्यान त्यांना बंदी बनवले जाते. यावेळी शुभमला स्मृतिभ्रंश होतो. याचाच फायदा घेऊन जिजि आक्का किर्तीला घराबाहेर काढते. पण किर्ती मात्र शुभमला मिळवण्यासाठी हरएक प्रयत्न करते. ती स्वतः त्याच्या शेजारी येऊन राहते, त्याला कामात मदत करते. पण जिजि आक्का मात्र तीला विरोध करतात आणि शुभमचं दुसरं लग्न करण्याचा घाट घालतात. आता खरे मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे.
आता किर्ती शुभमला कसं मिळवणार, या मालिकेचा गोड शेवट कसा होणार हे लवकरच कळेल. 4 डिसेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग टेलेकास्ट होणार आहे. ही मालिका जरी गोड वळणावर थांबणार असली तरी प्रेक्षकांना नाराज व्हायचं कारण नाही. लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पहाता येईल.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेच्या पुन:प्रसारणाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘ही मालिका स्टार प्रवाहच्या यशस्वी मालिकांपैकी एक आहे. सुंदर कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे ही मालिका रसिकांच्या मनात कायम घर करुन राहिल. प्रत्येक कथेला एक छान शेवट असतो. या मालिकेची गोष्ट आणि पात्रांचा प्रवास सुंदररित्या संपतोय. मालिका संपू नये ही रसिक प्रेक्षकांची मागणी हेच सिद्ध करतेय की ही मालिका जिंकलीय. म्हणूनच आपण ती पुनः प्रसारित करणार आहोत.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.