देशभरासह राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीबाबत कोरिओग्राफर आणि डान्सर फुलवा खामकरने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. कोरोना फुलवाच्या घरापर्यंत आला. तिच्या काकांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. हा संपूर्ण अनुभव तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी कसा होता, त्याचप्रमाणे या काळात डॉक्टरांनी कशाप्रकारे काळजी घेतली आणि कोरोनाने आपल्याला काय शिकवलं याबद्दल तिने या पोस्टमध्ये लिहिलं.
फुलवा खामकरची पोस्ट :
'कोरोना घरापर्यंत आला. आम्हाला मागच्या वर्षी झाला, तेव्हा त्याची झळ पोहोचली नव्हती. ती आता जास्त प्रकर्षाने जाणवली, माझा अत्यंत लाडका छोटा काका जेव्हा व्हेंटिलेटर गेला तेव्हा. आता कोणी ऐकणार नाहीये, कोरोनाची काय भीती ठेवायची आता? जगण्यासाठी काम तर केलंच पाहिजे ना? बघा कसं सगळं नॉर्मल चाललं आहे बाहेर.. हो हो मी पण क्लासेस घेते आहे ना.. इथे सगळं ओके आहे असं माझ्या मँचेस्टर इथे राहणाऱ्या डॉक्टर बहिणीला बोलणारी मी आणि माझ्यासारखे अनेक.'
'माझा हा सगळा आव आता गळून पडला आहे. हवं ते हॉस्पिटल सोडा पण आपल्याला साधा बेड मिळत नाही म्हणजे काय? टीव्हीवर जे सतत सांगत आहेत की ऑक्सिजन बेडसुद्धा उपलब्ध नाहीये म्हणजे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणजे काय हे सत्य खाडकन् थोबाडीत मारल्यासारखं समोर उभं राहिलं आणि अगदी आपल्या घरापर्यंत आलं.'
'पैसे आणि ओळख या घटकांना कोरोना ओळखतचन नाही. कोरोनाने कम्युनिस्म म्हणजे साम्यवाद परत आणलाय हेही तितकंच खरं. कोविड १९ सर्वांना समान लेखतो आहे. लहान, मोठं, गरीब, श्रीमंत, जात, धर्म त्याच्या खिजगणतीत नाहीये. माणसाला तो फक्त माणूस म्हणून बघतो. आपल्यातील अनेकांना ही पण एक त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट.'
हेही वाचा : 'रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या'; भरत जाधवचं आवाहन
या पोस्टच्या अखेरीस फुलवाने डॉक्टर्स, नर्सेस, आया, वॉर्डबॉय, पोलीस, मुंबई महानगरपालिका, सरकार या सर्वांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.