'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) या विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) दिग्दर्शित सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमानं केव्हाच १०० करोडच्या क्ल्बमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षक सिनेमा पहायला थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहे. लो बजेट मध्ये बनलेल्या सिनेमानं बॉक्सऑफिसवर केलेल्या कमाईची देखील सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. करणी सेनेने(Karni Sena) 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना विनंती करीत सिनेमाच्या कमाईतील ५० टक्के रक्कन दान करावी अशी मागणी केली आहे. ही रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी वापरता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. करणी सेनेनं निर्माते,दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि झी स्टुडिओजला यांसदर्भात आवाहन केलं आहे.
एका वृत्तत्राशी संवाद साधताना करणी सेनेचे अध्यक्ष सूरज पाल सिंग अमू यांनी चंदिगढमध्ये 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमाविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना सिनेमाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले,''काही राज्यांत हा सिनेमा करमुक्त घोषित केला गेला आहे. त्यामुळे आता तो सर्वसामान्य लोकही पाहू शकतात. तेव्हा आता या सिनेमाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी दान करायला हवी. सिनेमाचे निर्माते-दिग्दर्शकांनी यासंदर्भात पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे केवळ सिनेमात कथा दाखवण्यापुरतं नाही तर त्या सत्य घटनेप्रसंगी बळी पडलेल्या पीडितांच्या सोबत सिनेमाची टीम उभी आहे याची देखील खात्री होईल''. करणी सेनेचे सूरज पाल सिंग अमू पुढे असंही म्हणाले की,'' सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी जर याबाबतीत पावलं उचलली नाही तर त्यांना काश्मिरी पंडितांच्या भल्याची काळजी नव्हती आणि फक्त सिनेमासाठी त्यांच्या व्यथांचा वापर केला गेला असं मानलं जाईल. आणि तसं जर झालं तर करणी सेनेचे लोक हा सिनेमा पाहणार नाहीत''.
याच संदर्भात मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी देखील मागणी केली आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे, 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची कमाई १५० कोटींवर पोहोचली आहे. काश्मिरी पंडितांच्या भावनांचा लोकांनी खूप आदर केला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सिनेमाची कमाई काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या घरावर खर्च केली तर अधिक योग्य होईल'' असं म्हटलं आहे.. त्यावर उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी नक्कीच आपण भेटलो तर मदतीसंदर्भात बोलू असं उत्तर दिलं आहे.
मात्र यासंदर्भात सिनेमाच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसंच आतापर्यंत कोणतीही देणगी जाहिर झालेली नाही. सिनेव्यवसायातील जाणकारांच्या मते सिनेमा २०० करोडची कमाई करेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. तसं जर झालं तर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रदर्शित झालेल्या सिनेमांत सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.