PM Modi Meets Vyjayanthimala : 'भारतीय चित्रपट क्षेत्रातील तुमचं योगदान मोठं'! पंतप्रधान मोदींनी घेतली वैजयंतीमाला यांची भेट

मोदी यांनी वैजयंतीमाला (PM Modi Meets Vyjayanthimala) यांची त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
Vyjayanthimala news
Vyjayanthimala newsesakal
Updated on

PM Modi Meets Legendary Actress Vyjayanthimala : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला याची चेन्नई येथे भेट (PM Narendra Modi News) घेतल्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वैजयंती माला यांना नुकताच प्रतिष्ठेचा पद्मविभुषण पुरस्कार (Padma Vibhushan Award 2024) जाहीर झाला आहे. या निमित्तानं मोदीजींनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हे फोटो व्हायरल झाले असून यावेळी मोदी यांनी वैजयंती माला यांच्यासाठी खास पोस्टही शेयर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वैजयंती माला यांना भेटून खूप आनंद (Vyjayanthimala Latest News) झाला. त्यांची चेन्नईमध्ये भेट घेता आली. त्यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रात त्यांचे असणारे योगदान हे मोठे आहे.

वैजयंती माला यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी मोदी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्याचे फोटो नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन हे फोटो शेयर 'ज्वेल थिफ' स्टारचा सन्मान असे म्हटले आहे.

दुसरीकडे हेमा मालिनी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे. मी माझ्या रोल मॉडेलला भेटली आहे. चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट अविस्मरणीय अशीच आहे. त्यांच्यातील उर्जा, त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं प्रेरणादायी आहे. त्या नेहमीच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होत गेल्या. त्यांचं नृत्य पाहणं ते अनुभवणं ही देखील मोठी गोष्ट आहे. मला आता गतकाळातील अनेक आठवणींचा पट डोळ्यासमोर येतो आहे. त्या आठवणींनी मी भारावून गेले आहे. असे हेमाजींनी म्हटले आहे.

Vyjayanthimala news
Shah Rukh Khan On Ramcharan : शाहरुखनं केला रामचरणचा अपमान? 'त्या' उल्लेखामुळे नव्या वादाला सुरुवात, किंग खानचे चाहते उतरले मैदानात!

वैजयंती माला यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तमिळ चित्रपट वझाकाई (१९४९) मधून डेब्यू केले होते. पुढे त्या देवदास, संगम, मधुमती आणि नया दौरमध्ये दिसल्या होत्या. त्यांच्या त्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी वैजयंती माला यांना पद्मविभूषण या पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.