Kishor Kadam: "अरे लूट थांबवा रे ही ..", मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे टोलवर कवी सौमित्र यांची संतप्त पोस्ट

Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction For Pay Extra Toll In Mumbai Pune Highway
Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction For Pay Extra Toll In Mumbai Pune Highway Esakal
Updated on

Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction: सध्या महाराष्ट्रात टोल नाक्यावरुन बराच गदारोळ सुरु असून वातावरणही चांगलच तापलं आहे. काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अडवल्याने मनसैनिकांनी टोलनाका फोडला होता.

त्यानंतरही मनसैनिकांनी हा धडाका सुरुच ठेवला. मात्र जेव्हा राजकिय मंडळींना हा मनस्पात सहन करावा लागतो तेव्हाच अशा प्रकरणांची चर्चा होत असते. सर्व सामान्य माणसाला तर या समस्येतून रोजच जावे लागते.

त्याच्याही असाच मनस्ताप होतो. काही ठिकाणी तर विनाकारण टोल दोन वेळा घेण्यात येतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसते. काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने व्हिडीओ शेअर करत तक्रार केली होती. आता त्यातच आणखी एका कलाकारांने पोस्ट शेयर करत संताप व्यक्त केला आहे.

कामानिमित्त मराठी कलाविश्वातील कलाकारांना अनेकदा मुंबई- पुणे असा प्रवास करावा लागतो. तर पुण्यात राहणारे कलाकार देखील कामासाठी मुंबईला जातात. मुंबई- पुणे महामार्गावर प्रवास करतांना प्रत्येकाला टोल भरावा लागतो. आता अशातच कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेयर करत या बद्दल संताप व्यक्त केला आहे.

Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction For Pay Extra Toll In Mumbai Pune Highway
Ajinkya Deo: राहिल्या फक्त आठवणी... दोन ओळींमध्ये अजिंक्य देवने सीमा - रमेश देव यांची आठवण मनातलं दुःख मांडलं

कवी सौमित्र त्याच्या पोस्टमध्ये लिहितात की, "मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर 240 टोल घेतात .. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात ?

टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का ?

आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ?

अरे लूट थांबवा रे ही ..

लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?

कुणाकडे तक्रार करायची ?

याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?"

Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction For Pay Extra Toll In Mumbai Pune Highway
Malaika - Arjun: "ह्यांचं सगळं ओक्केमध्ये एकदम!" ब्रेकअपच्या चर्चानंतर मलायका - अर्जुन भर पावसात एकत्र जेवायला, व्हिडीओ व्हायरल

त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा देत त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगितले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं की, "सगळीकडे हेच चित्र आहे. मुंबईतला ऐरोली टोल नाका कशाला आहे ते कळत नाही,तिथला रस्ता किती वर्षे झाली खराबच आहे.खड्डे आणि पुढे टोल नेमकं कशाचा टोल भरायचा खड्ड्याचा का,तेच कळत नाही. रात्री दिवे नसतात तेव्हा तर आणखी वाट लागते."

दुसऱ्याने लिहिलयं, "हे असे आहे कारण आपण त्यांना उत्तरदायी करत नाही. पुणे मुंबई हायवे होऊनही आता २५ च्या वर वर्षे लोटली आहेत इतकी वर्षे जगात कुठेही टोल घेत नाही. ही बेशरम लूटमार आहे आणि आपण ती सहन करत आहोत. जिथे रस्ते प्रचंड खराब आहे तिथेही उद्दाम पणे टोल घेतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण आहे असे वाटत नाही"

Poet Kishor Kadam Saumitra Facebook Post Angry Reaction For Pay Extra Toll In Mumbai Pune Highway
Hemangi Kavi: "तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा..", हेमांगी कवीचा माफीनामा; पोस्ट व्हायरल

तर एकाने लिहिलयं, "ऋजुता देशमुख यांनी पण मागच्या महिन्यात याविषयी तक्रार नोंदवली होती असे त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या व्हिडीओ मधून कळाले"

नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या अनेक कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी ते अगदी बरोबर बोलत असल्याचा दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.