Nude Photoshoot मुळे रणवीर गोत्यात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude Photos
Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude PhotosInstagram
Updated on

(Bollywood)बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) गेल्या काही दिवसांत त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे भलताच चर्चेत आहे. त्या फोटोशूटमध्ये रणवीर नग्न अवस्थेत दिसल्यामुळे त्याला खूप वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे. रणवीरच्या त्या फोटोंमुळे त्याची पत्नी दीपिका पदूकोणची देखील खिल्ली उडवली जात आहे. अर्थात दीपिकानं समोर येऊन याविषयी बोलणं टाळलं असलं तरी त्यादरम्यान आणखी एक अडचण रणवीरसमोर उभी येऊन ठाकली आहे. (Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude Photos)

Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude Photos
Game Of Thrones फेम जेसन मोमोआच्या कारला अपघात, थोडक्यात बचावला अभिनेता

रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. न्यूड फोटोशूट प्रकरणात रणवीरनं भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा उल्लेख करत एका अशासकीय संस्थेनं मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत म्हटलं आहे की,श्याम मंगाराम फाऊंडेशन या NGO ने ही तक्रार केली आहे. तसंच,भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि वकील अखिलेश चौबे यांनी देखील चेंबूर पोलीस ठाण्यातच रणवीर सिंग च्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

NGO ने केलेल्या तक्रारी संदर्भात लिहिलं आहे की,''आम्ही गेल्या सहा वर्षांपासून विधवा महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करीत आहोत. गेल्या आठवड्यात आम्ही रणवीर सिंगचे काही न्यूड फोटो व्हायरल होताना पाहिले. ते फोटो ज्या पद्धतीनं क्लीक केले आहेत ते पाहून कोणाही महिला किंवा पुरुषाला लाज वाटावी''. तर रणवीर सिंग यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे तरुण पिढीवर गंभीर आणि वाईट परिणाम होतील तेव्हा रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी वकील चौबे यांनी केली आहे

Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude Photos
Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude PhotosGoogle

काही दिवसांपूर्वी रणवीरने पेपर मॅगझीनसाठी एक फोटोशूट केले होते. ज्याने सोशल मीडियावर खूपच गोंधळ माजवला होता. तसं पाहिलं तर रणवीर नेहमीच आपल्या अतरंगी स्टाइलमुळे चर्चेत पहायला मिळतो, पण रणवीरच्या या न्यूड फोटोंनी वादालाच सुरुवात केली. त्याचे हे फोटो वेगवेगळ्या पोझ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अभिनेत्याच्या या फोटोंना काहींनी पाठिंबा दर्शविला तर काहींनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. पण रणवीरचे म्हणणे आहे की,''हे फोटोशूट आहे, तो हजारो लोकांसमोरही न्यूड होऊ शकतो, त्याला याचा फरक पडत नाही''.

Police Complaint Against Ranveer Singh For Hurting Feelings of NGO Women Over Nude Photos
Bharti Singh च्या बाळाचा नवा फोटो नेटकऱ्यांना खटकला;म्हणाले,'हे योग्य नाही'

रणवीर सिंग हा तरुणांसाठी हिरो आहे त्यांने जे काही केलेय तसेच इतर कोणी केले तर चुकीचा पायंडा पडेल म्हणून या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे असा तक्रारदार यांचा दावा आहे .या प्रकरणात चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार अशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()