Paresh Rawal: बंगाल्यांनी काढला काटा... परेश रावल अडचणीत, पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

परेश रावल यांनी गुजरातमध्ये निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान रोहिंग्या मुसलमान आणि बंगाली लोकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Police Complaint filed against paresh rawal for his viral comment over cook fish for bengalis...
Police Complaint filed against paresh rawal for his viral comment over cook fish for bengalis... Esakal
Updated on

Paresh Rawal: परेश रावल सध्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या गुजरातमध्ये भाजपा मोठ्या प्रमाणात प्रचारसभा राबवताना दिसत आहे. याच प्रचारा दरम्यान परेश रावल यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. आता त्यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पश्चिम बंगाल मधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेता मोहम्मद सलीम यांनी परेश रावलच्या विरोधात कोलकाता येथील एका पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.(Police Complaint filed against paresh rawal for his viral comment over cook fish for bengalis...)

Police Complaint filed against paresh rawal for his viral comment over cook fish for bengalis...
Jubin Nautiyal Health Update: कंबर मोडली,हातानं धड जेवताही येईना... तरीही...

या तक्रारीत सलीम यांनी परेश रावल यांच्यावर सार्वजनिक मंचावर भाषणाच्या माध्यमातून धार्मिक वाद निर्माण करत दंगल करण्याचा हेतू आणि देशभरातील बंगाली आणि अन्य जाती-धर्मातील लोकांच्या भावना दुखावण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की,परेश रावल यांच्या या वक्तव्यामुळे स्थलांतरीत बंगाली लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी आपल्या तक्रारीत परेश रावल यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Police Complaint filed against paresh rawal for his viral comment over cook fish for bengalis...
Suniel Shetty: एकाच वेळी सुरु केलं करिअर, तरीही कसा पुढे निघून गेला अक्षय?; सुनिल शेट्टी स्पष्टच बोलला..

त्यांनी म्हटलं आहे की जसं परेश रावल यांनी बंगाली लोकांचा विषय काढला,त्यांची हेटाळणी केली त्याला पाहून वाटतंय की जसे देशातील सगळेच बंगाली रोहिंग्या किंवा बांग्लादेशी आहेत. त्यांनी आपल्या आरोपपत्रात लिहिलं आहे की-''मोठ्या संख्येनं काही बंगाली पश्चिम बंगालच्या बाहेर देखील वास्तव्य करुन आहेत. आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आणि कदाचित परेश रावल यांच्या वक्तव्यामुळे त्यांना बिनाकारण टार्गेटही केलं जाऊ शकतं''. सलीम यांनी तलतला येथील पोलिस स्टेशनमधील पोलिसांना सांगितलं की त्यांनी त्यांच्या या तक्रारीला एफआयआर समजावं.

Police Complaint filed against paresh rawal for his viral comment over cook fish for bengalis...
Paresh Rawal: 'तर मग तुम्ही बंगाली लोकांसाठी मासे शिजवाल का?', गुजरातमधील वक्तव्यानं परेश रावल अडचणीत...

गुजरातच्या विधानसभा निवडणुकां दरम्यान भाजपासाठी प्रचार करताना परेश रावल यांनी बांग्लादेशी,रोहिंग्या आणि मासे या मुद्द्यांना घेऊन काही अशी वक्तव्य केली ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. गुजरातच्या वलसाड मध्ये पार्टीच्या प्रचारा दरम्यान परेश रावल यांनी म्हटलं आहे की,''गॅस सिलेंडर महाग झालेयत पण त्यांची किंमत कमी होईल. लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल,गुजरातमध्ये राहणारे लोक महागाई सहन करतील पण बाजूला जर स्थलांतरित रोहिंग्या राहायला आले किंवा बांग्लादेशी रहायला आले तर गॅस सिलेंडरचं काय कराल? बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का तुम्ही?''

हेही वाचा: Swasthyam 2022 : शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योगाभ्यास

बस्स...परेश रावेल यांच्या या वक्तव्यावरनं मोठा वाद पेटला. अर्थात,परेश रावल यांनी ट्वीट करत आपल्या वक्तव्याविषयी माफी मागितली आहे. त्यांनी ट्वीटरवर लिहिलं होतं की,''मासे हा विषय का उकरुन काढला जातोय हे मला कळत नाही कारण मासे तर गुजराती लोक देखील खातात आणि शिजवतात. मी इथं स्पष्ट करू इच्छितो की,माझ्या बोलण्याचा उद्देश फक्त होता तो अवैध पद्धतीनं आपल्या देशात येऊन राहणाऱ्या बांग्लादेशी आणि रोहिंग्या यांच्यावर बोलण्याचा. तरिदेखील माझ्या वक्तव्यामुळे जर आपल्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागेन''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.