72 Hoorain: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 72 हुरे सिनेमाविषयी मोठा निर्णय, निर्मात्यांनी मानले आभार

72 हुरे सिनेमाचे निर्माते अशोक पंडित यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत धमक्या येत आहेत
police protection to ashok pandit who is producer of 72 hoorain bollywood movie thanks to cm eknath shinde and devendra fadnavis
police protection to ashok pandit who is producer of 72 hoorain bollywood movie thanks to cm eknath shinde and devendra fadnavis SAKAL
Updated on

72 Hoorain News: 72 हुरे सिनेमा काल ७ जुलैला संपूर्ण भारतात रिलीज झाला. 72 हुरे सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या संमीश्र प्रतिक्रिया समोर आल्यात. सिनेमाचा वादग्रस्त विषय,

धार्मिक भावना अशा अनेक गोष्टींमुळे सिनेमा सुरुवातीपासुन चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच 72 हुरे च्या निर्मात्याला धमकीचे मेल येत असल्याची धक्कादायक माहीती समोर आलीय.

(police protection to ashok pandit who is producer of 72 hoorain bollywood movie thanks to cm eknath shinde and devendra fadnavis)

police protection to ashok pandit who is producer of 72 hoorain bollywood movie thanks to cm eknath shinde and devendra fadnavis
72 Hoorain Review: दहशतवाद्याच्या डोळ्याची झापडं उघडणारा... कसा आहे 72 हुरे, वाचा एका क्लिकवर

72 हुरे सिनेमाचे निर्माते अशोक पंडित यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत धमक्या येत आहेत. अशोकला एका संवेदनशील विषयावर चित्रपट बनवल्यामुळे धमकी येत होती. तो या चित्रपटाचा सहनिर्माता आहे, त्यामुळे त्याला सतत धमक्या आणि ताकीद दिली जात होती.

आता अशोक पंडित यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे कारण चित्रपट प्रदर्शित होताच त्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.

अशोक पंडित म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली होती.

पोलिसांकडून संरक्षण मिळाल्यानंतर अशोक पंडित यांनी मुख्यमंत्र्यांसह मुंबई पोलिसांचे आभार मानले. दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मी कोणाला घाबरत नाही आणि या सगळ्याची आपल्याला पर्वा नाही, असेही अशोक पंडित म्हणाले.

police protection to ashok pandit who is producer of 72 hoorain bollywood movie thanks to cm eknath shinde and devendra fadnavis
प्रथमेश सासुबाईंना 'या' नावाने मारतो हाक Prathamesh Laghate

72 हुरे चे दिग्दर्शन संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर बशीर आणि पवन मल्होत्रा ​​यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 50 लाखांची कमाई केली आहे, चित्रपटाची प्रसिद्धी लक्षात घेता हे खराब कलेक्शन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.