रणबीर(Ranbir Kapoor)- आलिया भट्ट (Alia Bhatt)लग्न सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच रणबीरच्या बान्द्रा येथील 'वास्तू' इमारतीजवळ नातेवाईकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. सोबत पोलिसांचा ताफाही दिसून येतो. पोलिस आहेच पण त्याचसोबत रणबीर-आलियानंही म्हणे एका सिक्युरिटी सेवा पुरवणाऱ्या कंपनीला कॉंट्रॅक्ट दिलं आहे त्यांचेही सुरक्षारक्षक मोठ्या संख्येने तिथे पोहोचलेत. मीडियाही विवाहस्थळी गर्दी करुन असल्यानं हा सगळा गोंधळ आवरताना पोलिसांची दमछाक होतेय. पोलिस कायदा अन् सुव्यवस्थेत बिघाड होवू नये म्हणून दंडूक उभारून आपलं काम करतायत. पण त्यामुळेच मीडिया अन् पोलिसांत बाचाबाची झाल्याचं कळतंय.
आज सकाळीच विवाहस्थळी म्हणजेच रणबीरच्या वास्तू इमारतीत आई नीतू कपूर(Neetu Kapoor),बहिण रिद्धिमा कपूर, आणि तिची मुलगी यांना गाडीतून आलेलं पाहिलं गेलं. तेव्हा मीडियाच्या काही फोटोग्राफर्सनी फोटो काढण्यासाठी गाडी समोरच गर्दी केली अन् त्यामुळे तिथल्या रस्त्यावर मागून येणाऱ्या गाड्यांची भली मोठी रांग लागली. हा सगळा झालेला गोंधळ आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिस अन् मीडियात वाद झाल्याची बातमीही समोर आली. पण नंतर कळलं की वाद बाऊन्सर्स आणि मीडियात झाला,त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
सुरक्षारक्षकांना मीडियाचे फोटोग्राफर ऐकत नाहीत हे दिसून आलं तेव्हा त्यांनीच तिथे उपस्थित पोलिसांना मध्यस्थी करायला सांगितली. अशाप्रकारे गाडीसमोर येऊन गर्दी करताना चुकून अपघात होईल अन् गोंधळ उडेल त्यामुळं सुरक्षारक्षकांनी तिथे पोलिसांना मध्ये आणलं. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी फोटोग्राफर्सना इमारतीच्या गेटजवळून मागे हटण्याच्या सुचना दिल्या. कोणत्याही येणाऱ्या गाड्यांना न थांबवण्याचे आणि त्यांच्यासमोर किंवा भोवती गर्दी न करण्याची ताकीदही दिली. तेव्हा मीडियानंही आपल्याकडून चुकीचं काही घडणार नाही आणि नियम पाळून फोटो क्लिक केले जातील असं आश्वासन पोलिसांना दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.