Pooja Bhatt: वडिलांच्या 'त्या' गोष्टी मनावर घेतल्यानं आलिया मोठी सेलिब्रेटी! पूजा भट्टनं केला खुलासा

पूजानं तिला तिच्या वडिलांकडून काय मिळाले याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
Pooja Bhatt Actress Comment on Alia Bhatt Father Mahesh Bhatt
Pooja Bhatt Actress Comment on Alia Bhatt Father Mahesh Bhattesakal
Updated on

Pooja Bhatt Actress Comment on Alia Bhatt Father Mahesh Bhatt : प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टनं तिची बहीण आलियाविषयी जे वक्तव्य केलं आहे त्याची सध्या जोरदार चर्चेत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा भट्ट ही वेगवेगळ्या कारणामुळे लाईमलाईटमध्ये आहे. आता तिनं आलियावर केलेलं वक्तव्य चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

पूजानं तिला तिच्या वडिलांकडून काय मिळाले याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यात ती म्हणते, मी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत राहिले. त्या गोष्टी आलियामध्ये नाहीत. ती एक चांगली गोष्ट आहे. मी माझ्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली गेलेली सेलिब्रेटी आहे. या आक्रमकपणाचा मला अनेकदा तोटा झाला आहे. खरंतर दरवेळी तुम्ही त्याच भूमिकेत असणे हीच मोठी साहसाची गोष्ट असते.

मी जेव्हा एखाद्या महिलेबाबत बोलते तेव्हा मी वास्तविक माझ्या स्वताविषयी बोलत असते. मी कोणत्यातरी कारणाशिवाय बोलत नाही. त्यामागे माझी वेगळी भूमिका असते. याचाही विचार व्हायला हवा. याबाबत मला माझ्या बहिणीचे आलियाचे कौतुक वाटते. तिला काही गोष्टी माझ्या वडिलांकडून मिळाल्या आहेत. त्यामुळे ती आजच्या घडीला सर्वाधिक यशस्वी आहे. तिला कसं व्यक्त व्हावं हे कळलं आहे. त्यामुळे ती खूपच संयमानं वागते. सोशल मीडियावरही कसं बोलावं हेही तिला माहिती आहे.

लोकांसमोर आपण काय बोलले पाहिजे आणि काय नाही याचे आलियाला ज्ञान आहे. त्यामुळे ती ज्या कारणामुळे चर्चेत असते ते वेगळे आहे. आपल्याला कुणी ट्रोल करत असल्यास त्यांना कशाप्रकारे सामोरं जायला हवं हे आलियाला माहिती आहे. अशा शब्दांत पूजानं आलियाविषयी सांगितलं आहे.

आपल्या वैवाहिक आयुष्यावरही पूजानं यावेळी मत व्यक्त केलं आहे. मी जे काही केलं ते कुणी सांगितलं म्हणून नाही. ज्या गोष्टी चूकीच्या वाट्याला त्यांना मी नेहमीच विरोध केला. त्यासाठी मोठी किंमतही मला चुकवावी लागली होती. मी त्याचा विचार केला नाही. माझ्यासारख्या लोकांसाठी समाजानं जो एक बॉक्स तयार केला आहे त्यात मला अडकून पडायचे नव्हते. अनेकदा मी त्यात गुंतून गेले होते.

मला तेव्हा वाटले होते की, लग्न करुन मी फसले होते. लग्न केल्यानंतर मला जाणवले की, ती गोष्ट माझ्यासाठी नव्हती. मी त्या गोष्टीचा स्विकार केला असता तर मी माझं अस्तित्व मिटवून टाकलं असतं. मी माझ्या जगण्याचं भान विसरुन गेले होते. मला काय करायचं आहे हेही मला माहिती नव्हते. अशा भाषेत पूजानं तिचं मत व्यक्त केलं होतं.

Pooja Bhatt Actress Comment on Alia Bhatt Father Mahesh Bhatt
Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

पूजाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती शेवटी बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. त्यात तिच्या परफॉर्मन्सची चर्चा होती. पूजा ही नेहमीच तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली गेली आहे. आपली भूमिका रोखठोकपणे मांडण्यास ती नेहमीच अग्रेसर असते. तिनं बिग बॉसमध्ये देखील तिच्या आक्रमक स्वभावाची ओळख करुन दिली होती.

Pooja Bhatt Actress Comment on Alia Bhatt Father Mahesh Bhatt
Shah Rukh Khan : किंग खान कोणत्या सेलिब्रेटींना म्हणतो बेटा अन् कुठल्या अभिनेत्रीला म्हणतो आई?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.