Poonam Pandey: आपल्या बोल्डनेसमुळे आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच आपल्या कामापेक्षा तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेली पहायला मिळते. पूनमचं म्हणणं आहे की कामामुळे मिळालेली ओळख पुढे अनेक वर्ष राहते.
आणि हेच कारण आहे की सध्या ती वादांपासून दूर रहायचा प्रयत्न करत आहे. एका मुलाखती दरम्यान पूनमने बॉलीवूड, कॉन्ट्रोव्हर्सी आणि आपल्या फिल्मी प्रवासावर मनमोकळा संवाद साधला.(Poonam Pandey says fame from controversy stay only 15 minutes)
पूनम म्हणाली,'' मी आता कॉन्ट्रोव्हर्सी पासून लांब राहण्याचा प्रयत्न करतेय. यावेळी मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मला वाटतं कॉन्ट्रोव्हर्सी फक्त काही काळापुरतं आपल्याला प्रसिद्धि मिळवून देते ..जी खरंतर १५ मिनिटाची असते..त्यापेक्षा जास्त काळ नाही''.
''लोक तुमची चर्चा करतात पण जोपर्यंत तो वाद सुरु आहे तोपर्यंत. त्यानंतर तुम्हाला विसरून जातात पण तुम्ही जे काम करता त्यामुळे पुढील अनेक वर्ष तुमची ओळख लोकांमध्ये राहते. मी नेहमीच बिनधास्त काहीतरी पटकन बोलून बसते पण आता मला वाटतं की कधी-कधी शांत राहणं देखील महत्त्वाचं असतं''.
'' खरं सांगू तर मी आता गेल्या काही प्रसंगांमधून एक शिकवण नक्कीच घेतली आहे की गोष्टी मॅनेज करायला शिकलं पाहिजे. देवाचे मी आभार मानते की आता मला चांगलं काम मिळत आहे''.
''बॉलीवूडमध्ये स्क्रिप्टला घेऊन जो वाद सुरू आहे त्यावर मला वाटतं की जेवढ्या स्क्रिप्टस लिहिल्या जातात त्यामागे कोणाचा तरी एक विचार असतो. कोणाच्या विचारांना आपण नाही थांबवू शकत. संपूर्ण जगात खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत..प्रत्येक ठिकाणच्या स्क्रिप्टसला तिथल्या मातीचा सुगंध असतो''
''आणि त्या -त्या ठिकाणी तशाच स्क्रिप्टस पसंत केल्या जातात. असं आपल्या देशातही व्हायला हवं. लोकांना समजलं पाहिजे की फक्त सिनेमा फ्रायडे ला रिलीज होतो. सिनेमा एंटरटेन्मेंटचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला एंटरटेन्मेंट हवी आहे..तर पहा..नाहीतर सोडून द्या''.
यावेळी पूनमनं कपड्यांवरनं कलाकारांना ट्रोल केलं जातं यावरही आपलं मत मांडलं. ती म्हणाली,''कधीकधी सोशल मीडियावर इतक्या घाणेरड्या कमेंट्स केल्या जातात की वाचूनही लाज वाटते. लोकांनी कधीच कोणावर त्याच्या शरीरावरनं,कपड्यांवरनं कमेंट करू नये. सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे रहायचा हक्क आहे. ज्याला जे घालावसं वाटतं त्यानं घालावं ..इतरांनी त्यावर आक्षेप घेऊ नये''.
पूनम पांडेनं ओटीटी प्लॅटफॉर्मचं स्वागत करत आपण तीन वेब सिरीज मधून लवकरच भेटीस येत आहोत असं सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.