Poonam Pandey Video : पूनम ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. यापूर्वी कोणत्याही सेलिब्रेटीनं प्रसिद्धीसाठी जे केलं नाही ते पूनमनं करुन दाखवलं अशा (Poonam Pandey Viral News) शब्दांत नेटकऱ्यांनी तिला बोलून दाखवलं होतं. त्याला कारणही तसचं होतं. पूनमनं स्वताच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती.
भलेही पूनमनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर करत आपण जिवंत असल्याचे जाहीर केले (Poonam Pandey Latest news) असले तरी ती नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय ठरली. त्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. सर्व्हिकल कॅन्सर सारख्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आपण हे सारं केल्याचे तिचे म्हणणे होते. आपला उद्देश खूपच उदात्त होता. पण माझ्या नावाचा वापर करुन दुसऱ्यांनीच त्यांचे प्रमोशन करुन घेतले. असा आरोप तिनं केला होता.
इंस्टावर पूनमनं आपण खरं सत्य काय असे म्हणत अनेक पोस्ट शेयर केल्या होत्या. त्यात तिनं कुणाचे नाव न घेता तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले होते. या सगळयात पूनमचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती पहिल्यांदाच तिच्या त्या बातमीनंतर स्पॉट झाली आहे. ती देवदर्शनाला निघाल्याचा तो व्हिडिओ असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ट्रॅडिशनल लूक मध्ये पूनमच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस मिळाल्या आहेत. त्यावरून नेटकरी अजूनही तिच्यावर कमालीचे नाराज असल्याचे दिसून आले आहे.पूनम तू जे काही केले आहेस त्याला माफी देता येणार नाही. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
पापाराझी विरल भयानीनं व्हायरल केलेल्या त्या व्हिडिओमध्ये पूनम देवदर्शनाला गेल्याचे दिसते. आयएनएसच्या एका रिपोर्टनुसार पूनम पांडेनं सर्व्हिकल कॅन्सरच्या नावाखाली आपल्या मृत्यूच्या बातमीचे प्रमोशन करत मुंबईतील अंधेरीमध्ये असणाऱ्या लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शन घेतल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.