Selena Gomez: 'हे जग बदलता आलं असतं तर..' सुप्रसिद्ध अभिनेत्री का झाली भावुक? सोशल मिडियावरून घेतला ब्रेक

Popular Actress Selena Gomez  Take Break From Social Media:
Popular Actress Selena Gomez Take Break From Social Media:
Updated on

Selena Gomez Take Break From Social Media: हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्य किंवा व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सेलेना सोशल मिडियावरही चांगलीच सक्रिय असते.

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. भारतातही तिच्या गाण्यांचा चाहता वर्ग आहे. मात्र आता सेलेनाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने तिच्या इंस्टास्टोरीमधून जाहिर केले की ती सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. पण तिने अचानक एवढा मोठा निर्णय का आणि कसा घेतला हे देखील सेलेनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Selena Gomez  Take Break From Social Media:
Selena Gomez Take Break From Social Media:

सेलेनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, 'मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. कारण जगात सुरू असलेली दहशत, द्वेष, हिंसा आणि दहशत पाहून माझे हृदय तुटत आहे. लोकांचा छळ आणि हत्या किंवा कोणत्याही एका समूहाप्रती द्वेषा हे कृत्य भितीदायक आहे.

आपण सर्व लोकांचे, विशेषत: लहान मुलांचे रक्षण केले पाहिजे. हा हिंसाचार एकदाचा थांबवावा. माझे शब्द प्रत्येकासाठी किंवा हॅशटॅगसाठी कधीही पुरेसे नसल्यास मला माफ करा. निष्पाप लोकांना दुखापत होताना पाहणं मला सहन होत नाही आहे.

याचा मला खुप त्रास होत आहे. यामुळे मी आजारी पडत आहे. मी हे जग बदलू शकली असती तर . पण एक पोस्ट असं करू शकत नाही. लव्ह, सेलेना.'

सध्या सेलेनाची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. तिने हा निर्णय इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे अनेक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर सेलेनाने दुःख व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध 6 ऑक्टोबर रोजी सुरू झाले असून ते अजूनही सुरू आहे. या युद्धात आत्तापर्यंत दोन्ही देशांतील हजारो लोक मारले गेले आहे. अशा परिस्थितीत अनेक हॉलिवूड कलाकारांनी आपआपली मते व्यक्त केली आहेत. सेलेना गोमेझने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर भाष्य केले आहे. आता ती सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.