जेठालालची 50 रुपयांची कमाई लाखांवर गेली; कोटींची मालमत्ता 

popular comedy show taarak Mehta ka ooltah chashmah jethalal fame actor dilip joshi fees career journey
popular comedy show taarak Mehta ka ooltah chashmah jethalal fame actor dilip joshi fees career journey
Updated on

मुंबई - जेठालालला कोण ओळखत नाही, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निमित्तानं तो जगभरात प्रसिध्द झाला आहे. आज जो जेठालाल आपल्याला दिसतो आहे त्याची भूमिका करणारे अभिनेते दिलिप जोशी मोठ्या संघर्षातून पुढे आले आहे. त्यांचा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे. तारक मेहताचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. सध्या देशातील सर्वाधिक टीआरपीचा कार्यक्रम म्हणून तारक मेहता मालिकेचे नाव घेतले जाते. या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचे आहेत. मात्र यासगळ्यात जेठालालची गोष्ट वेगळी आहे.

जेठालालची आताची कमाई ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कोणेएकेकाळी जेठालालची रोजची कमाई ही 50 रुपये होती. आता तो आकडा लाखाच्या घरात गेला आहे. 52 वर्षीय कलाकार दिलिप जोशी हे एका गुजराती परिवारातून आले आहेत. लहानपणापासुन अभिनयाची आवड असणारे दिलिप जोशींना करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मिळण्यापूर्वी आपल्याला बराचकाळ संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तारक मेहताच्या मालिकेतील एक महत्वाचे नाव म्हणून जेठालाल यांचे नाव घ्यावे लागते. मागील 12 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तारक मेहता’च्या लोकप्रियतेमागे अभिनेता दिलीप जोशी उर्फ ‘जेठालाल चंपकलाल गडा’ यांचे योगदान महत्वाचे आहे.

तारक मेहता या मालिकेला मिळणारी प्रसिध्दी एवढी आहे की जेठालाल यांनी कधीही चित्रपटात जाण्याचा विचार केला नाही. मात्र ही मालिका करण्यापूर्वी त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. सलमान आणि माधुरी दीक्षित यांची भूमिका असणारा हम आपके है कौन या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. तारक मेहता मालिकेत जेठालालची भूमिका त्यांनी 12 वर्षे केली आहे. जेठालाल हे त्या मालिकेतील प्रमुख पात्र असल्याने त्यांना इतरांच्या तुलनेत दिले जाणारे मानधनही जास्त आहे. आता जेठालाल यांना एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये मिळतात. आता जेठालाल 37 कोटींचे मालक असल्याची चर्चा आहे.

याशिवाय जेठालाल यांनी मैंने प्यार किया मध्येही नोकराची भूमिका केली होती. त्याअगोदर कामाच्या शोधात ते खूप भटकले. काही वेळा त्यांना ऑडियंसमध्येही उभे राहावे लागले. त्या कामासाठी त्यांना 50 रुपये मिळत होते. जेठालाल यांनी हूं हुंशी हुंशीलाल, हम आपके हैं कौन, यश, फ‍िर भी दिल है हिंदुस्‍तानी, खिलाड़ी 420, हमराज, दिल है तुम्‍हारा या चित्रपटात काम केले आहे. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.