P V Gangadharan Passed Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, आणि मातृभूमी या सिनेमाने प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक पीव्ही गंगाधरन यांचे शुक्रवारी पहाटे 6.30 वाजता कोझिकोड येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
वयाशी संबंधित आजारांमुळे गंगाधरन हे गेल्या आठवडाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पी व्ही गंगाधरन यांना राष्ट्रीय पुरस्काराने ओळखले गेले आहे. त्यांनी भारतीय मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
गृहलक्ष्मी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटांमध्ये “ओरू वादक्कन वीरगधा,” “अंगाडी,” “एकलव्य”, “अचुविंते अम्मा” आणि “कनाक्किनावू” यांचा समावेश आहे. चित्रपट निर्मितीतील त्यांच्या विपुल कारकिर्दीव्यतिरिक्त, गंगाधरन यांनी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. चित्रपट निर्मात्यांची एक प्रमुख जागतिक संघटना म्हणून ओळखलं जातं. (Latest Marathi News)
केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पीव्ही गंगाधरन यांचा जन्म 1943 मध्ये केटीसी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक पीव्ही सामी आणि माधवी सामी यांच्या घरी झाला. मातृभूमी सिनेमाचे व्यवस्थापकीय संपादक पी.व्ही.चंद्रन हे त्यांचे बंधू आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी शेरीन आणि मुलं शेनुगा, शेगना आणि शेरगा असा परिवार आहे. जयतिलक, विजिल आणि संदीप हे त्यांचे जावई आहेत. पीव्ही गंगाधरन हे मलबार विमानतळ कर्मा समिती आणि ट्रेन कर्मा समितीचे अध्यक्ष होते. केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि केरळ फिल्म चेंबरचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
पीव्ही गंगाधरन यांच्या निधनाने मल्याळम मनोरंजन विश्वावर आणि संपूर्ण भारतीय मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.