Prajakta Gaikwad News: संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाडला संभाजी मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली.
प्राजक्ता सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत प्राजक्ताला सर्वांसमोर बोलता बोलता रडू कोसळलं.
(Prajakta Gaikwad burst into tears in front of everyone, video viral)
प्राजक्ताला सर्वांसमोर का रडू कोसळलं याचं कारण म्हणजे प्राजक्ताचे आजोबा कै. तुकाराम हरिभाऊ खेडकर यांचं प्रथम पुण्यस्मरण होतं.
त्यानिमित्ताने प्राजक्ताला आजोबांच्या आठवणीत रडू कोसळलं. प्राजक्ताने सोशल मीडियावर हा भावुक व्हिडिओ शेयर करून तिला आलेला अनुभव सांगितला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून प्राजक्ताचं सांत्वन केलंय.
प्राजक्ता लिहिते.. "आज आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण... वर्षश्राध्द.. आज पहिल्यांदाच माईक समोर तोंडातून शब्द फुटण्या ऐवजी डोळ्यातून पाणी येत होतं... कारण अजूनही खरं वाटत नाही की आजोबा आपल्या मध्ये नाहीत..
ज्यांनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली , आमच्यावर धार्मिक, अध्यात्मिक संस्कार केले ते कायमच आमचे आधारस्तंभ राहतील. आज वर्ष झालं तरी सगळ्यांच्या डोळ्यात , मनात तुमच्या आठवणी कायम आहेत आजोबा. तुम्हाला आदरपूर्वक श्रध्दांजली..
आज जयश्रीताई तिकांडे यांचं किर्तन ठेवलं होतं... अगदी सरळ, साध्या, पण मार्मिक शब्दांत ताईंनी किर्तन केलं. ताई तुमचे मनापासून आभार.
तुमचे किर्तन ऐकून कान अगदी तृप्त झाले.|| राम कृष्ण हरी ||" अशा शब्दात प्राजक्ताने तिचा भावुक अनुभव सर्वांसोबत शेयर केलाय.
प्राजक्ताचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. "मी तर पहिल्यांदाच अस पाहिलंय की कोणत्या तरी सिनेअभिनेत्री ने आपल्या घरी कीर्तन ठेवलंय..",
"हा ठेवा मोठा आहे, हा आशिर्वाद मोठा आहे, आजन्म आहे..अश्याच कायम प्रेमळ रहा.", अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या कृतीचं कौतुक केलंय.
प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी नाटकात अभिनय करत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभरात दौरे सुरु आहेत.
सध्या १ ते ६ मार्च २०२३ स्थळ:- जोल्ले शिक्षण संकुल निपाणी येथे या नाटकाचे भव्य दिव्य प्रयोग रंगणार आहेत. या नाटकात प्राजक्ता छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.