मालिका, चित्रपट या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही तिची झी मराठीवरील गाजलेली मालिका. त्यांनतर तिने अनेक मालिका आणि चित्रपट केले. नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' चित्रपटातही तिने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. सध्या ती सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. प्रसाद ओक दग्दर्शित 'चंद्रमुखी' चित्रपटात तिने केलेली नैना चंद्रपूरकरची भूमिका विशेष ठरली. पण आता ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
भोंगे प्रकरणावर तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलेला पाठिंबा आणि त्यासंदर्भात केलेले ट्विट तिला चांगलेच भोवले होते. चाहत्यांनी सडकून टीका केल्यांनतर तिने भोंग्याबाबतचे ट्विट डिलीट केले. आता पुन्हा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या एका फेसबूक पोस्टवरून चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. प्राजक्ताने (prajakta mali) नुकतेच तिचे फोटो समाज माध्यमावर शेअर केले.या फोटोंना तिने कवितेच्या ओळी कॅप्शन म्हणून दिलेल्या आहेत. (prajakta mali trolled for facebook post)
या फोटोवर प्राजक्ताने ज्येष्ठ दिवंगत कवयित्री शांताबाई शेळके (shanta shelke) यांच्या कवितेच्या ओळी कॅप्शन म्हणून वापरल्या आहेत. 'थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा.. ऋतू हिरवा, ऋतू बरवा…'अशा त्या ओळी आहेत. परंतु या ओळींना शांताबाईंचे नाव देताना तिने शांता शेळके ऐवजी 'शांती शेळके' असे लिहिले आहे.शांताबाईंच्या नावाचा चुकीचा उल्लेख केल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत. तिची ही पोस्ट सध्या भलतीच ट्रॉल होत असून अनेकांनी टीका केल्या आहे.
'राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या महान कवयित्रीची चूक काढता?राजद्रोहाचा गुन्हा दाखल होईल..', 'कवियत्रीचं नाव शांताबाई शेळके असे आहे. जरा आदर दाखवावा', 'भोंग्याचा गोंगाट हिच्या मस्तकात ईतका भिनलाय की सुप्रसिद्ध कवयत्रीचे नाव सुद्धा विसरली..', 'या असल्या चुका चुकून होत नसतात. हे एक विक्रुत षडयंत्र..' अशा काही प्रतिक्रिया तिला मिळाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.