Prajakta Koli Aka MostlySane Announces Engagement To Boyfriend Vrishank Khanal: अभिनेत्री प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत साखरपूडा उरकला आहे. प्राजक्ताने रविवारी इंस्टाग्रामवर तिचा आणि वृशांकचा फोटो शेयर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.
या सेल्फीमध्ये प्राजक्ताने तिची हिऱ्यांची अंगठी दाखवली आहे. फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा ड्रेस घातला तर वृशांक पांढऱ्या टी-शर्टमध्ये आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत होता. हा फोटो शेयर करत प्राजक्ताने या पोस्टला कॅप्शन दिले, "वृषांक आता माझा एक्स प्रियकर आहे ."
तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबतच तिच्या मित्रांनीही प्रतिक्रिया देत दोघांना शुभेच्छा दिल्या आहे.
प्राजक्ता आणि वृशांक हे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कॉलेजच्या दिवसांपासून ते एकमेकांना ओळखतात. त्यातच प्राजक्ताच्या करिअरमध्येही वृशांकने तिला नेहमी पाठिंबा दिला आहे. वृशांक हा व्यावसायाने वकिल आहे. प्राजक्ता आणि वृशांक यांनी यापुर्वीही त्याचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्याची जोडीही प्रेक्षकांना खुप आवडते.
प्राजक्ता ही प्रसिद्ध YouTuber आहे. त्याचबरोबर ती अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहे. तिने यापुर्वी वेबसिरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी देखील निवड करण्यात होती. हृतिक रोशनपासून रणवीर सिंग पर्यंत अनेक बॉलिवूड तसेच आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत तिने व्हिडिओ बनवले आहेत.
नेटफ्लिक्सवर वरील 'मिसमॅच' या गाजलेल्या सिरीजमुळे प्राजक्ता लोकप्रिय झाली. त्याचबरोबर तिने 'जुग जुग जीयो' या चित्रपटात अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्याबरोबर काम केले आहे. ती नुकतीच 'नीयत' चित्रपटात विद्या बालनसोबत स्क्रिन शेयर करतांना दिसली होती. त्यातच आता तिने तिच्या आणि वृशांकच्या नात्याची अधिकृत घोषणा करत साखरपुडा उरकला. तिचे चाहते तिच्यासाठी खुप खुश आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.