Prajakta Mali News: प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावरील चर्चेतील अभिनेत्री. प्राजक्ताने विविध सिनेमा, मालिका आणि वेबसिरीजमधून प्रेक्षकांंचं मनोरंजन केलंय.
प्राजक्ता माळी तिच्या सोशल मीडियावर विविध अपडेट्स शेअर करत असते. अशातच नुकतीच आयुष्यात एक खास गोष्ट प्राजक्ताने पूर्ण केलीय.
(prajakta mali complete art of living foundation course sri sri ravishankar)
प्राजक्ताने आयुष्यात केली ही खास गोष्ट
प्राजक्ताने नुकतंच सोशल मीडियावर एक खास पोस्ट केलीय. यात ती बँगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमाबाहेर उभी असलेली दिसतेय.
प्राजक्ता गेल्या अनेक दिवसांपासुन श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स करत आहे. याविषयीची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केलीय. अखेर प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगचा फाऊंडेशन कोर्स पूर्ण केलाय. याचा आनंद तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
प्राजक्ता स्वतःला ठेवणार हे नाव
प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स पूर्ण केल्यावर सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीलीय. यावेळी प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्समधले व्हिडीओ शेअर केलेत. हे व्हिडीओ पोस्ट करुन प्राजक्ता लिहीते,
"मी आता स्वतःला “गुरूपूजा पंडीत” म्हणु शकते का? काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला..
२२ देश, ६३० लोकं आणि प्राजक्ता...
प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगचे व्हिडीओ शेअर करत पुढे लिहीलंय, "तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. ह्या course ला किती महत्व आहे, हे आर्ट ऑफ लिव्हिंग कुटुंब समजू शकेल. माझ्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद."
अशाप्रकारे प्राजक्ताने सर्वांसोबत तिचा आनंद शेअर केलाय. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सुत्रसंचालन करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.