Prakash Jha Latest News ‘सिनेमे फ्लॉप झाले तरी स्टार्सना कोणताही फरक पडत नाही आहे. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मोठे अभिनेते गुटखा विकत आहेत. ते चित्रपट बनवत नाही आहे. त्यांना वेळ मिळाला तर रिमेकचे हक्क घेऊन चित्रपट बनवतात. त्यांना फरक पडत नाही’, असे गंगाजल, अपहरण व राजनीती सारखे चित्रपट बनवणारे प्रकाश झा (Prakash Jha) म्हणाले.
प्रकाश झा सध्या ‘मट्टो की सायकल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात प्रकाश झा यांनी काम केले आहे. हा चित्रपट १६ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अलीकडच्या काळात अनेक मोठे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेत. यावर प्रकाश झा उघडपणे बोलले. ‘चांगले दिग्दर्शक व लेखकांची कमतरता नाही. परंतु, त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही’ असे प्रकाश झा (Prakash Jha) म्हणाले.
चित्रपट सृष्टीतील मोठ्या कलाकारांवर त्यांनी राग काढला. गुटख्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर प्रकाश झा यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मोठे अभिनेते कशाप्रकारचे शिक्षण देत आहेत. सर्व मोठे अभिनेते गुटखा विकत आहेत. यातच त्यांचा जीव अडकला आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. नाहीतर ज्यांनी त्यांना स्टार बनवले तेच त्यांना बुडवतील’ असेही प्रकाश झा म्हणाले.
चांगले दिग्दर्शक, लेखकांना कोणी विचारत नाही
दक्षिणेतील चित्रपटांमध्ये प्रयोग केले जात आहेत. नवनवीन कथा तयार होत आहेत. प्रादेशिक चित्रपटांत हे नेहमीच घडले आहे. फक्त दक्षिणच नाही तर बंगाली, तामीळ, तेलुगू, कन्नडमध्येही प्रयोग होत आहेत. मात्र, बॉलिवूडमध्ये असे होत नाही आहे. जे चांगले दिग्दर्शक, लेखक आहेत त्यांना कोणी विचारत नाही, असेही प्रकाश झा म्हणाले.
आश्रमचे सर्व सिझन हिट
प्रकाश झा यांच्या आश्रम या वेबसिरीजने बरीच प्रशंसा मिळवली आहे. ते आश्रमचे निर्माता आणि दिग्दर्शक आहे. आश्रममध्ये बॉबी देओलने मुख्य भूमिका साकारली आहे. या मालिकेचे ३ सीझन आले आहेत. तिन्ही सीझन यशस्वी झाले आहेत. आश्रमचा चौथा सीझन २०२३ मध्ये येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.