Prakash Raj : 'पैशांसाठी मुर्खाचा बाजार म्हणविले जाणारे चित्रपट करतो, दुसरं काय'!

राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाकार प्रकाश राज हे नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाकार प्रकाश राज हे नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाकार प्रकाश राज हे नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. esakal
Updated on

Prakash Raj Bollywood Actor Negative Roles : राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाकार प्रकाश राज हे नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आपल्याला जे योग्य वाटते ते बोलून मोकळे होणारे प्रकाश राज यांना त्यामुळे अनेकदा वादालाही सामोरं जावं लागलं आहे.

आताही प्रकाश राज यांनी आपण ज्या चित्रपटांना प्रेक्षक मुर्ख म्हणतात त्यात काम का करतो याविषयी बेधडकपणे प्रतिक्रिया दिली आहे. जी चर्चेत आली आहे, यावेळी त्यांनी आपण काही मुर्खांचा बाजार म्हटल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये का काम केले याविषयी सांगितले आहे. अमर उजालानं याविषयी अधिक माहिती देणारं वृत्त दिले आहे.

अभिनेत्यानं यावेळी काही वेगवेगळ्या गोष्टींचाही खुलासा केला आहे. काही चित्रपट मी फ्री मध्ये देखील करतो. ज्यावेळी मला एखाद्या चित्रपटाचा विषय आवडतो त्यातील संदेश हा खरचं प्रेक्षकांपर्यत पोहचावा असे मला वाटते तेव्हा मी त्याविषयांवरील चित्रपट स्विकारतो आणि त्यात काम करतो. त्यावेळी माझ्यापुढे पैसे हा काही महत्वाचा मुद्दा नसतो.

दुसरीकडे जेव्हा माझं मन मला सांगते की, मला पैशांची गरज आहे अशावेळी मी काही मुर्खांचा बाजार म्हटल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये देखील काम करतो. अशा शब्दांत प्रकाश राज यांनी स्पष्टपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे कुणी मला त्यावरुन काहीही म्हणत असेल तरी मला त्या कृतीमागील भूमिका अन् हेतू माहिती असतो. तो मी प्रत्येकाला समजावून सांगु शकत नाही.

मी जे चित्रपट मोफत केले त्याविषयी कुणी काहीही म्हणत नाही. त्याचे नाव सुद्धा घेत नाही. बाकीच्या चित्रपटांवरुन बोलले जाते. अशावेळी मला जे योग्य वाटते ते मी करतो. आतापर्यत मी माझे आयुष्य माझ्या नियम आणि अटींवर जगलो आहे. आणि पुढेही तसेच करणार आहे.

प्रकाश राज यांचे आगामी चित्रपट...

अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास ते तब्बल चार वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात महेश बाबूच्या गुंटूरचा समावेश आहे. तसेच ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या देवरा मध्ये, पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या ओजी मध्ये तर अल्लु अर्जुनच्या पुष्पा २ मध्ये प्रकाश राज झळकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.