Prakash Raj Congratulate ISRO: चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण हा ऐतिहासिक होता.
सर्व देशात जल्लोषात तो साजरा करण्यात आला. सर्वांनीच इस्रोचे अभिनंदन केले. त्यातच आता साउथस्टार प्रकाश राज यांनीही चांद्रयान 3 च्या यशाबद्दल इस्रोच्या टिमचं अभिनंदन केले आहे. सुरुवातीला प्रकाश राज यांनी चांद्रयान 3 मोहिमेची खिल्ली उडवली होती. त्यामुळे आता त्याची ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
प्रकाश राज यांनी त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर होती ज्यात त्यांनी चांद्रयान 3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप त्यांच्यावर करत खुप टिका करण्यात आली. इतकच नाही तर बागलकोटमधील बनहट्टी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
मात्र आता चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर प्रकाश राज यांची आणखी एक पोस्ट समोर आली आहे. त्यात त्यांनी इस्रोच्या टिमचं कौतुक केलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "भारत आणि लोकांसाठी अभिमानाचा क्षण... #ISRO #Chandrayaan3 #VikramLander आणि ज्यांनी हे घडवून आणण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे आभार.. हे आपल्याला आपच्या ब्रह्मांडाचे रहस्य शोधण्यात आणि ते साजरे करण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल,#JustAsking"
त्यानंतर त्याचे ट्विट थोड्याच वेळात व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत त्यांना पुन्हा ट्रोल केले.
यापुर्वी त्यांनी चहा विक्रेत्याचे एक व्यंगचित्र शेअर केले होते. त्यात त्यांनी लिहिले- 'चंद्रावरून येणारे पहिले चित्र... #justasking. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी त्यांच्यावर खुपच टिका केली होती.
पोस्ट री-ट्विट करत त्यांनी लिहिले होते की, तुम्हाला जर माझ्या त्या बोलण्यातील विनोद कळला नसेल तर तुम्हीच खरचं चंद्रावर आहात. मी त्या ट्विटमधून हॅशटॅग आर्मस्ट्राँग च्यावेळचा विनोद शेयर केला आहे. यामध्ये मला ज्यांनी ट्रोल केले त्यांना नेमका कोणता चहावाला दिसला हे मला माहिती नाही. तुम्हाला मी काय म्हणालो हेच कळले नाही. असे प्रकाश राज यांनी म्हटले होते. आता त्यातच त्यांनी इस्रोच्या टिमचं कौतुक केल्याने पुन्हा ते चर्चेत आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.