Prakash Raj Birthday: ३०० रुपये मानधनावर काम करायचे प्रकाश राज, आडनाव बदलंल आणि आज कमावतयात..

अत्यंत स्ट्रगल करून नाव मिळवणाऱ्या प्रकाश राज यांचं जाणून घ्या खरं आडनाव..
Prakash Raj once earned 300 rupees in theatre show career struggle personal life income
Prakash Raj once earned 300 rupees in theatre show career struggle personal life income sakal
Updated on

Prakash Raj Birthday: बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्यांनी केवळ दाक्षिणात्य नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे. ते समाजातील घडामोडींवरही नेहमीच अगदी परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. त्यामुळे ते अनेकदा चर्चेतही असतात. अशा प्रकाश राज यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या खडतर प्रवासाविषयी..

दाक्षिणात्य चित्रपटांपासून करिअरची सुरुवात करणारे अभिनेते प्रकाश राज आता बॉलिवूडमध्येही सुपरिचित आहेत. त्यांनी कधी खलनायक साकारून प्रेक्षकांना घाबरवलं तर कधी कॉमेडियन बनून त्यांना हसवलं.

'सिंघम', 'वॉन्टेड' यांसारख्या चित्रपटांत काम करून त्यांनी बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. आज जरी ते कोट्यावधी कमावत असले तरी एक काळ असा होता की ते ३०० रुपये महिना मानधनावर काम करत होते.

(Prakash Raj once earned 300 rupees in theatre show career struggle personal life income)

Prakash Raj once earned 300 rupees in theatre show career struggle personal life income
Prakash Raj Birthday: १२ वर्ष लहान मुलीशी लग्न आणि ५० व्या वर्षी पाळणा.. प्रकाश राज यांचा नाद नाय!

प्रकाश राज हे आता जरी चित्रपटसृष्टीत मोठं नाव असलं तरी एकेकाळी त्यांनीही फार संघर्ष केला आहे. ते आधी थिएटर शो करायचे आणि त्यावेळी त्यांना या स्टेज शोसाठी फक्त ३०० रुपये इतकं महिन्याचं मानधन मिळायचं.

पण त्यांनी हार मानली नाही. अभिनयाच वेड उरात असल्याने त्यांनी भाषेची बंधनं झुगारून कामं केली. आतापर्यंत प्रकाश राज यांनी कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळी आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे देशभरात आज हा एक ओळखीचा आणि महत्वाचा चेहरा बनला आहे.

प्रकाश राज यांनी 'बिसिलु कुदुरे' नावाच्या एका टीव्ही शोमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र तामिळ भाषेतील चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यांनी १९९४ मध्ये 'डुएट' या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्याचवेळी त्यांनी आपलं आडनाव बदललं. दिग्दर्शकाच्या सल्ल्यानुसार त्यांनी 'राय' हे आडनाव बदलून प्रकाश 'राज' असं केलं. 

तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास कधीच थांबला नाही. त्यांनी आजवर शेकडो दाक्षिणात्य सिनेमे केले. खलनायक आणि उत्तम विनोदी अभिनेता अशा दोन्ही भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. हिंदीतही त्यांनी वॉन्टेड, हिरोपंती, सिंघम, गोलमाल अगेन, दबंग या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. आज ते आपल्या भूमिकेसाठी कोट्यावधी रुपये मानधन घेत असले तरी सुरुवात मात्र त्यांनी अगदी शून्यातून केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.