Prakash Raj clarifies his tweet on chandrayan 3 with cartoon : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. समाजातील वेगवेगळ्या घडामोडींवर तितक्याच पोटतिडकीनं भूमिका घेत त्यावर कोणाचीही भीती न बाळगता ते ठामपणे बोलत असतात. सध्या त्यांनी चांद्रयान ३ वर केलेलं ते वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
प्रकाश राज यांनी काल चांद्रयान ३ वरुन एक ट्विट केले होते. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. भारत जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख तयार करत असताना आपल्याच भारतीय शास्त्रज्ञांचा अशा प्रकारे अपमान करणे आणि त्या महत्वकांक्षी प्रोजेक्टची थट्टा उडवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न प्रकाश राज यांना विचारण्यात आला होता.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
प्रकाश राज यांनी ते व्टिट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली होती. काहींनी त्यांना देशद्रोही असेही म्हटले होते. आपल्या ट्विटवरील वाढता वाद पाहून प्रकाश राज यांनी त्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. प्रकाश राज यांनी काल एका चहावाल्याचे कार्टून शेयर केले होते. मात्र ते कार्टून पाहिल्यावर इस्त्रोचे माजी प्रमुख सिवन यांचे असल्याचे अनेकांनी म्हटले.
कार्टूनमध्ये त्यांनी शर्ट आणि लुंगी परिधान केली असून ते एका कपातून दुसऱ्या कपात चहा ओतताना दाखवण्यात आले होते. त्यावेळी प्रकाश राज यांनी म्हटले होते की, ब्रेकींग न्यूज चंद्रावरुन पहिला फोटो आपल्या भेटीला. हॅशटॅग विक्रमलँडर...या ट्विटवरुन प्रकाश राज यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली आहे.
आता प्रकाश राज यांनी आपल्या त्या ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तुम्हाला जर माझ्या त्या बोलण्यातील विनोद कळला नसेल तर तुम्हीच खरचं चंद्रावर आहात. मी त्या ट्विटमधून हॅशटॅग आर्मस्ट्राँग च्यावेळचा विनोद शेयर केला आहे. यामध्ये मला ज्यांनी ट्रोल केले त्यांना नेमका कोणता चहावाला दिसला हे मला माहिती नाही. तुम्हाला मी काय म्हणालो हेच कळले नाही. असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.