विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमा पाहणारे लोकं सिनेमागृहातवं बाहेर पडताना रडताना दिसत आहेत. जिथे एकीकडे या सिनेमाची प्रशंसा तोंडभरून केली जात आहे,तिथे दुसरीकडे वादांनी देखील या सिनेमाला घेरलेलं आहे. रोज जसं सिनेमाचं कौतूक कानावर पडत आहे तसंच सिनेमाविषयी नवा विरोधही ऐकायला मिळत आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार या सिनेमानं मुसलमान धर्मियांना उगाचच खलनायक बनवायचा प्रयत्न केला आहे. आता असं बोलणाऱ्यांच्या गटात बॉलीवूडचे सुप्रसिद्ध व्हिलन प्रकाश राज देखील सामिल झाले आहेत.
काय म्हणाले आहेत प्रकाश राज?
बॉलीवूडमधील अनेकांनी आता 'द काश्मिर फाईल्स' सिनेमावर आपलं मत मांडण्यास सुरुवात केली आहे. यातील काही जणांना सिनेमा खूप भावला आहे,त्यांनी सिनेमाचं मनपासून कौतूकही केलेलं आपण पाहिलं असेल. पण काही लोकांना हा सिनेमा हेतुपुरस्सर बनवलाय असं वाटत आहे. त्यांच्या मते हा सिनेमा लोकांच्या मनात फक्त हिंसा निर्माण करीत आहे. त्यात भर म्हणून आता अभिनेता प्रकाश राज यांनी सिनेमाविषयीचे आपले विचार ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सिनेमा संपल्यानंतर थिएटरमधील वातावरणाचा आढावा घेणारा हा व्हिडीओ आहे.
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत लोकांचं हिंसक रुप दिसत आहे. यामध्ये लोकं मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात घोषणा देत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना प्रकाश राज यांनी लिहिलं आहे,''द काश्मिर फाईल्स झालेल्या जखमांवर फुंकर मारतेय की हिंदू-मुस्लिमांमध्ये पुन्हा तिरस्कार निर्माण करण्याचं काम करत आहे? मी फक्त विचारत आहे''.
प्रकाश राज यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांच्यावर त्यानंतर प्रश्नांचा भडिमार केला आहे. त्यांनी ट्वीटमधूनच विवेक अग्निहोत्रींना विचारलं आहे,''दिल्ली दंगल,गोध्रा केस, नोटबंदी आणि कोविड या विषयाच्या फाईल्स बनवायला आवडेल का तुम्हाला?'' त्यांनी आणखी एक यासंदर्भातलं ट्वीट करताना म्हटलं आहे,''हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न यामार्गे केला जात आहे. देश हिंदू-मुसलमान दोन गटात विभागला जाईल. आणि अखंड भारत राहणार नाही. या ट्वीटनंतर मात्र प्रकाश राज यांच्यावर ट्रोलर्सनी जणू हल्लाबोल केला. लोकांनी खूप हीन दर्जाच्या कमेंट्स त्यांच्या ट्वीटवर केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.