कोण होते नामदेव व्हटकर? ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण यात्रा अजरामर केली.. प्रसाद ओकनं सांगितला 'तो' इतिहास

'ईसकाळ'ला दिलेल्या मुलाखती प्रसाद ओकनं परिनिर्वाण सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत.
Prasad Oak
Prasad OakEsakal
Updated on

Prasad Oak: कोण आहेत नामदेव व्हटकर? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी का जोडलं जातंय यांचं नाव? म्हणे..या माणसानं अशी एक गोष्ट करुन ठेवलीय ज्यामुळे बाबासाहेबांशी मनानं जोडलेला प्रत्येकजण धन्य पावेल..नव्हे आमच्या बाबासाहेबांची 'ही' आठवण त्यांनी जतन केल्यानं जो-तो नामदेव व्हटकरांसमोर नतमस्तक होईल.

या सगळ्याचा उलगडा होणार आहे प्रसाद ओक अभिनित 'परिनिर्वाण' सिनेमातून. चला तर मग..प्रसाद ओक कडून जाणून घेऊया डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आपल्या नॅशनल हिरोशी संबंधित 'परिनिर्वाण' सिनेमाशी तो कसा जोडला गेला...नामदेव व्हटकर कोण..बाबासाहेबांशी त्यांचे नाते काय.. आणि बाबासाहेबांच्या नेमक्या कोणत्या गोष्टीचे ते साक्षीदार होते...' या सिनेमाच्या पोस्टर लॉंच निमित्तानं प्रसाद ओकनं ईसकाळशी मनमोकळा संवाद साधला आहे. प्रसाद ओकच्या व्हिडीओ मुलाखतीची लिंक बातमीत जोडलेली आहे. (Prasad Oak New Movie dr.babasaheb ambedkar namdev vhatkar)

Prasad Oak
Priya Bapat: 'तुला पाहून मला 'हास्यजत्रे'तला सावत्या आठवला..'

प्रसाद ओक या सिनेमात नामदेव व्हटकरांची भूमिका साकारत आहे. जरी बायोपीक नसला तरी तो एक असं व्यक्तीमत्त्व साकारत आहे जे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित आहे. प्रसादनं नामदेव व्हटकरांची भूमिका साकारण्यासाठी तयारी सुरु केली आहे. नामदेव व्हटकरांसारखं दिसण्यासाठी..त्यांच्यासारखं चालणं-बोलणं सगळं अंगिकारण्यासाठी नेमकं प्रसाद काय करतोय हे त्यानं या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. आता 'धर्मवीर' मध्ये प्रसादनं साकारलेले आनंद दिघे साहेब पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना आता नामदेव व्हटकर साकारण्यासाठी प्रसाद नेमकं काय करतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता असणारच.

Prasad Oak
Prajakta Mali: 'बहरला हा मधुमास नवा..'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नामदेव व्हटकर यांच्यावरील 'परिनिर्वाण' सिनेमा प्रसादला जेव्हा ऑफर झाला तेव्हा होकार द्यायला त्यानं किती वेळ लावला होता.. याचं प्रसादनं दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. सिनेमाविषयी सुरुवातीला कन्फ्युज होऊन प्रसादनं अनेक प्रश्न विचारले होते. तेव्हा नेमकं बाबासाहेबांच्या सिनेमाविषयी प्रसादला हो म्हणताना काय प्रश्न पडले होते ते जाणून घ्यायचं असेल तर बातमीत जोडलेली मुलाखत नक्की ऐका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()